22 November 2024 4:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

SBI Home Loan | एसबीआय गृह कर्जदारांना मोठा धक्का, तुमच्या होम लोन EMI मध्ये वाढ होणार, खर्च वाढणार

SBI Home Loan

SBI Home Loan | रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर आता देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयनेही आपल्या ग्राहकांवरील कर्जाचा बोजा वाढवला आहे. बँकेने एक्सटर्नल बेंचमार्क आणि रेपो रेटशी जोडलेल्या कर्जावरील व्याजदरात ०.५० टक्के वाढ केली आहे.

बँकेच्या वेबसाइटनुसार, गृह आणि वाहन कर्जासह बाह्य बेंचमार्क (ईबीएलआर) आणि रेपो रेट (आरएलएलआर) शी संबंधित सर्व प्रकारच्या कर्जांवरील व्याजदर १५ ऑगस्टपासून वाढले आहेत. याचा थेट परिणाम ग्राहकांच्या ईएमआयवर होणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला रिझर्व्ह बँकेनेही महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी रेपो दरात 0.50 टक्क्यांची वाढ केली होती. एसबीआयनेही १५ ऑगस्टपासून आपल्या एमसीएलआरमध्ये ०.२० टक्के वाढ केली आहे.

एमसीएलआरमध्ये वाढ झाल्यानंतर एक वर्षाचा व्याजदर वाढून 7.70 टक्के झाला आहे, जो आधी 7.50 टक्के होता. त्याचप्रमाणे दोन वर्षांचा एमसीएलआर ७.९ टक्के आणि तीन वर्षांचा एमसीएलआर ८ टक्क्यांवर गेला आहे. सध्या बँकेची बहुतांश कर्जे ही एक वर्षाच्या एमसीएलआर दराशी निगडित आहेत.

आरबीआयच्या सूचनांचे पालन :
आरबीआयच्या सूचनांचे पालन करत एसबीआयसह बहुतांश बँका ऑक्टोबर 2019 पासून आपल्या कर्जाच्या व्याजदराला बाह्य मापदंड किंवा रेपो व्याजदराशी जोडत आहेत. याच कारणामुळे आरबीआयच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीच्या निर्णयांचा थेट परिणाम कर्जाच्या व्याजदरावर होतो. यापूर्वी रेपो रेटमध्ये झालेली ५० बेसिस पॉइंटची वाढ थेट गृहकर्ज आणि वाहन कर्जाशीही जोडली जात आहे.

आता व्याजदर काय :
एसबीआयमध्ये 50 बेसिस पॉईंट्सची वाढ झाल्यानंतर एक्सटर्नल बेंचमार्कचा व्याजदर म्हणजेच ईबीएलआर 8.05 टक्के झाला आहे, तर आरएलएलआरशी संलग्न कर्जासाठी रेपो रेट 7.65 टक्के झाला आहे. याउपरही बँक क्रेडिट रिस्क प्रीमियम आकारते. म्हणजेच तुम्ही गृह किंवा वाहन कर्ज घेत असाल तर या व्याजदरात क्रेडिट रिस्क प्रिमियम (सीआरपी) देखील जोडला जाईल.

सिबिल स्कोअरनुसार….
एसबीआयसह सर्वच बँका ग्राहकांच्या सिबिल स्कोअरनुसार कर्जाच्या व्याजदरात सीआरपीची भरही घालतात. जर एखाद्याचा सिबिल स्कोअर 800 च्या वर असेल तर त्यात सीआरपी जोडला जाणार नाही, परंतु जर या सिबिल स्कोअरपेक्षा कमी असेल तर सीआरपी 10 बेसिस पॉईंट्सपासून 60 बेसिस पॉईंटपर्यंत जोडला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत तुमचा प्रभावी व्याजदर 8.65 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो.

ईएमआयचा बोजा किती वाढणार :
जर तुमचं 30 लाख रुपयांचं गृहकर्ज 20 वर्षांसाठी 7.8 टक्के व्याजाने चालू असेल तर सध्याचा ईएमआय 24,721 रुपये असेल. अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण कालावधीत व्याज म्हणून 29,33,060 रुपये द्याल. आता बँकेने व्याजदरात 50 बेसिस पॉईंट्सची वाढ केली आहे, तर प्रभावी व्याजदर 8.30 टक्के असेल. आता तुमचा ईएमआय २५,६५६ रुपये येईल. म्हणजेच तुमचा खर्च दरमहा ९३५ रुपये आणि वर्षभरात ११,२२० रुपयांनी वाढेल. या व्याजदरानुसार संपूर्ण कार्यकाळात नव्या गृहकर्जावर ३१,५७,४९० रुपये व्याज म्हणून भरावे लागणार आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: SBI Home Loan EMI will be hike check details 16 August 2022.

हॅशटॅग्स

#SBI Home Loan(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x