Multibagger Stocks | या शेअर्सनी फक्त 1 महिन्यात दिला तिप्पट परतावा, गुंतवणूकदार झाले मालामाल, कमाईची जबरदस्त संधी
Multibagger Stocks | मागील आठवड्यात सेन्सेक्समध्ये 1,074 अंकांची म्हणजेच 1.83 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. आणि निफ्टीमध्ये 300 अंकांची म्हणजेच 1.95 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. गेल्या आठवड्यात शेअर बाजारात फक्त 4 दिवस व्यवहार झाले होते. FIIs ची खरेदी, डॉलरची घसरण, कंपन्यांचे चांगले जबरदस्त निकाल आणि चांगला मान्सून यामुळे शेअर बाजाराला सकारात्मक साथ मिळाली. मागील आठवड्यात सलग चौथ्या आठवड्यात शेअर बाजारात जबरदस्त वाढ पाहायला मिळाली. त्याच वेळी, मागील एका महिन्यात सेन्सेक्समध्ये 9.06 टक्के ची वाढ झाली होत, तर निफ्टी निर्देशांक 8.72 टक्के वधारला होता. पण एकाच महिन्याच्या कालावधीत असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना तिप्पट नफा कमावून दिला आहे. अश्या जबरदस्त शेअर्सची आपण या लेखात माहिती घेणार आहोत.
सैलानी टूर :
सैलानी टूर्स लिमिटेड ही एक स्मॉल कॅप कंपनी असून त्याचे बाजार भांडवल फक्त 23.45 कोटी रुपये आहे. मागील आठवड्यात 1 महिन्यात हा स्टॉक 205.83 टक्क्यांनी वाढला होता. हा स्टॉक 1 महिन्यापूर्वी 16.30 रुपयांवर ट्रेड करत होता तो आता 49.85 रुपयांपर्यंत वाढला आहे. शुक्रवारी दिवसा अखेर स्टॉक 5 टक्क्यांनी घसरला आणि 49.85 रुपयांवर जाऊन बंद झाला. खूप कमी काळात 205.83 टक्के परताव्यासह, गुंतवणूकदारांचे 1 लाख रुपये तब्बल 3.05 लाख रुपये झाले आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा की छोट्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करताना खूप जास्त जोखीम असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे चांगले.
जयंत इन्फ्राटेक :
जयंत इन्फ्राटेक कंपनीनेही मागील 1 महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. या कंपनीचा शेअर 87.90 रुपयांवर ट्रेड करत होता तो आता 254.50 रुपयांवर पोहोचला आहे. अशा प्रकारे, गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या शेअर्समधून तब्बल 189.53 टक्के परतावा कमावला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 82.35 कोटी रुपये आहे. फक्त 1 महिन्यात मिळणारा 189.53 टक्के परतावा हा मुळात ठेवी सारख्या लहान गुंतवणूक पर्यायांपेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे. शुक्रवारी ह्या शेअरमध्ये 5 टक्क्यांची वाढ होऊन शेअर्स ची किंमत 254.50 रुपयांवर जाऊन बंद झाली.
प्रेशर सेन्सिटिव्ह :
प्रेशर सेन्सिटिव्ह कंपनी परतावा देण्याच्या बाबतीत कोणत्याही कंपनीच्या मागे नाही. मागील 1 महिन्यात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 188.60 टक्के परतावा मिळवून दिला आहे. त्याचा स्टॉक 15.35 रुपयांवर ट्रेड करत होता तो आता 44.30 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. म्हणजेच या शेअर्स मधून गुंतवणूकदारांना तब्बल 188.60 टक्के परतावा मिळाला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 65.72 कोटी रुपये आहे. शुक्रवारी ह्या शेअरमध्ये 5 टक्के वाढ झाली होती, आणि शेअर्स 44.30 रुपयांवर जाऊन बंद झाले.
ग्रेडियंट इन्फोटेनमेंट :
ग्रेडियंट इन्फोटेनमेंटनेही मागील आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. त्याचा शेअर 2.18 रुपयांवर ट्रेड करत होता तो आता 6.14 रुपयांवर गेला आहे. या स्टॉक मधून गुंतवणूकदारांना तब्बल 181.65 टक्के नफा मिळाला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 14.22 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. शुक्रवारी ह्या शेअरमध्ये 4 टक्क्यांच्या वाढीसह शेअर्स ची किंमत 6.14 रुपयांवर गेली होती.
103 टक्क्यांपर्यंत परतावा देणारे इतर स्टॉक्स :
वर नमूद केलेल्या शेअर्सव्यतिरिक्त, असे इतर स्टॉक आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना फक्त एका महिन्यात तब्बल 103.78 टक्के परतावा मिळवून दिला आहे. यामध्ये खालील स्टॉक चा समावेश आहे.
* एबीसी गॅस -149.83 टक्के,
* साधना ब्रॉडकास्ट (149.06 टक्के),
* हरिया अपरल्स (148.43 टक्के),
* रिजन्सी सिरॅमिक (146.95 टक्के),
* जे. टपरिया प्रोजेक्ट्स (146.71 टक्के),
* एनआयबीई (137.77 टक्के),
* स्ट्रडी इंडस्ट्रीज ( 133.33टक्के),
* श्री गँग इंडस्ट्रीज (127.94टक्के),
* क्वांटम डिजिटल (127.14 टक्के),
* जीएसएल सिक्युरिटीज (121.39टक्के),
* ग्लोबल रुद्रा. इन्फ्रा (115.23 टक्के),
* PM Telelinks Ltd (105.12 टक्के),
* Sampre Nutrition (103.78 टक्के).
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Multibagger Stocks has given triple times return to it share holders on 16 August 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार