23 November 2024 10:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज तेजीने मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL
x

Multibagger Stocks | लॉटरीच लागली! या शेअरच्या गुंतवणूकदारांना 9000 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा आणि मल्टिबॅगर डिव्हीडंड सुद्धा

Multibagger Stock

Multibagger Stocks | प्रेमको ग्लोबलचे शेअर्स मागील काही वर्षांपूर्वी 4.50 रुपयांवर ट्रेड करत होते ते आता 400 रुपयांच्या वर गेले आहेत. कंपनी आता आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त लाभांशाची भेट देणार आहे. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी 567 रुपये आहे.

वस्त्रोद्योगाशी संबंधित उद्योग करणाऱ्या या स्मॉल कॅप कंपनीने मागील काही वर्षांत आपल्या भागधारकांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. आपण ज्या कंपनी बद्दल चर्चा करत आहोत ती आहे प्रेमको ग्लोबल लिमिटेड. कंपनीच्या शेअर्सने मागील काही वर्षांत 4.50 रुपयांच्या किमतीवरून 400 रुपयांपर्यंतचा टप्पा गाठला आहे. प्रेमको ग्लोबलच्या शेअर्सनी या कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 9000 टक्के परतावा दिला होता. कंपनी आता आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त लाभांश भेट म्हणून देणार असल्याचे जाहीर केले आहे. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी 567 रुपये आहे.

प्रती शेअर 20 टक्के अंतरिम लाभांश देणारी प्रेमको ग्लोबल कंपनी आर्थिक वर्ष 2022-2023 साठी आपल्या गुंतवणूकदारांना पहिला अंतरिम लाभांश देणार आहे. कंपनी आपल्या 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक शेअरवर 20 टक्के लाभांश जाहीर करत आहे. कंपनीने आपल्या पहिल्या अंतरिम लाभांशासाठी 25 ऑगस्ट 2022 ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. Premco Global कंपनी 11 सप्टेंबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी आपल्या भागधारकांना अंतरिम लाभांश वितरीत करेल.

1 लाख रुपयेवर 90 लाखांपेक्षा जास्त परतावा :
27 ऑगस्ट 2004 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर प्रेमको ग्लोबलचे शेअर्स 4.51 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत होते. 12 ऑगस्ट 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 442.05 रुपयांच्या किमतीवर जाऊन बंद झाले होते. जर तुम्ही 27 ऑगस्ट 2004 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक करून ती गोल्ड केली असती, तर सध्या तुमची गुंतवणूक रक्कम 98 लाखांच्या वर गेली असती. प्रेमको ग्लोबलच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी 290.55 रुपये आहे.

30 महिन्यांत किंमत 46 रुपये ते 400 रुपयेवर :
प्रेमको ग्लोबलच्या शेअर्समध्ये मागील 30 महिन्यांत जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. 26 मार्च 2020 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये कंपनीचे शेअर्स 46 रुपयेला ट्रेड करत होते. 13 ऑगस्ट 2022 रोजी दिवसा अखेर कंपनीचे शेअर्स BSE वर 442.05 रुपयांवर जाऊन बंद झाले. जर तुम्ही 26 मार्च 2020 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, आणि त्याची गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तर सध्या तुमची गुंतवणूक 9.60 लाख रुपये झाली असती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mulitbagger Stocks Premco global share price return and bonus announcement on 16 August 2022

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x