वंदे मातरम् चळवळ उत्तम | आता जनतेने, पत्रकारांनी आणि विरोधकांनी वंदे मातरम् बोलतच भाजपला महागाई, बेरोजगारीवर प्रश्न विचारानं गरजेचं

Vande Mataram | शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप आज झाले. यामध्ये सांस्कृतिक खात्याची जबाबदारी भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीरमुनगंटीवार यांच्या खांद्यावर पडली आहे. मुनगंटीवार यांच्याकडे जबाबदारी येताच त्यांनी मोठी घोषणा केली आहे. भारतीयस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आपण हॅलो हा विदेशी शब्द त्यागत त्याऐवजी शासकीय कार्यालयांमध्ये यापूढे वंदे मातरम् म्हणत संभाषण सुरु करणार आहोत अशी माहिती दिली.
१८०० मध्ये टेलिफोन अस्तीत्वात आल्यापासून आपण हॅलो या शब्दाने संभाषण सुरु करतआलो आहोत. आता हॅलो ऐवजी वंदे मातरम् ने संभाषण सुरु करण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्यामंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीरकेला. सांस्कृतिक कार्या विभागातर्फे याबाबतचा शासन निर्णय निर्गमीत करण्यात येईल, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.
सरकारी कार्यालयांमध्ये फोनवर हॅलो म्हणण्याऐवजी वंदे मातरम म्हणण्याच्या आवाहनाला पंकजा मुंडे यांनी समर्थन दिले आहे. त्या म्हणाल्या, ‘अमित शहा यांच्या कार्यालयात फोन केला की हॅलोऐवजी फक्त वंदे मातरम् बोलले जाते. भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातही फोन केल्यावर फक्त वंदे मातरम् बोलतात, ते ऐकायलाही छान वाटत. आम्हीही इकडून वंदे मातरम् म्हणतो. ज्या गोष्टी बोलल्यामुळे अभिमान वाटतो त्या म्हणायला हरकत नसावी, असं म्हणत पंकजा यांनी या निर्णयाला समर्थन दिले आहे.
वादाचे मुद्दे हेडलाईनमध्ये – भाजपाच्या रणनीतीचा इतिहास :
दरम्यान, या मुद्यावरून विरोधकांमधील कोणी नकारात्मक टिपणी करत का यावर देखील भाजप नेत्यांचं लक्ष असावं असं प्रथमदर्शनी पाहायला मिळतंय. एबीपी माझावरील याच विषयावरील एका चर्चेत काँग्रेसचे नेते राजू वाघमारे आणि भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्यात वाद झाल्याचं पाहायला मिळालं. त्यात भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जी आरडाओरडीची संधी साधली त्यातून तो प्रत्यय आला. वास्तविक सामान्य जनतेच्या मूळ मुद्द्यांना बगल देऊन इतर धार्मिक, जातीय आणि वादाचे मुद्दे हेडलाईनमध्ये ठेवणं असा भाजपाच्या रणनीतीचा इतिहास आणि अनुभव आता संपूर्ण देशाला आला आहे. त्यामुळे आता जनतेने, पत्रकारांनी आणि विरोधकांनी सुद्धा या विषयावर वाद न करता अभिमानाने ‘वंदे मातरम’ असं म्हणतच भाजपच्या दिल्ली ते गल्लीतील नेत्यांवर महागाई, बेरोजगारी आणि ढासळलेल्या अर्थव्यवस्थेवरून प्रश्नांचा भडीमार करून त्यांना त्यांच्याच कात्रीत पकडणं गरजेचं आहे.
अजित पवार काय म्हणाले :
राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी फोनवर हॅलोऐवजी आता वंदे मातरम बोलावं यासंदर्भात केलेल्या विधानाचाही अजित पवार यांनी खरपूस समाचार घेतला. “महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यापेक्षा नको ते विषय पुढे आणले जात आहेत. आता कुणी कुणाला भेटल्यावर जय हिंद म्हणतो, कुणी जय हरी म्हणतो. आता मध्येच काय यांनी वंदे मातरम काढलं. आमचा वंदे मातरम म्हणण्याला विरोध नाही. पण हा विषय सध्या महत्वाचा आहे का? महागाईवर बोला, जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावला आहे त्याचं काय करणार आहात? यावर बोलायला हवं”, असं अजित पवार म्हणाले.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Vande Mataram in Maharashtra Govt office check details here 16 August 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP