LIC Special Campaign | पॉलिसीधारक बंद पडलेल्या पॉलिसींचे पुनरुज्जीवन करू शकतील, LIC ची विशेष मोहीम

LIC Special Campaign | सार्वजनिक क्षेत्रातील आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) व्यपगत वैयक्तिक विमा पॉलिसींचे पुनरुज्जीवन करण्याची संधी देणारी मोहीम सुरू केली आहे. एलआयसीने मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, युलिप (युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन) वगळता सर्व पॉलिसी विशेष मोहिमेंतर्गत विलंब शुल्कात सूट देऊन पुन्हा सुरू केल्या जाऊ शकतात. ही मोहीम १७ ऑगस्टपासून सुरू होऊन २१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत सुरू राहणार आहे.
निवेदनानुसार, युलिप वगळता सर्व पॉलिसी पहिल्या प्रीमियममध्ये डीफॉल्ट झाल्याच्या तारखेपासून पाच वर्षांच्या कालावधीत काही अटींसह पुनरुज्जीवित केल्या जाऊ शकतात.
मायक्रो इन्शुरन्स पॉलिसी- विलंब शुल्कावर सूट :
मायक्रो इन्शुरन्स पॉलिसींच्या विलंब शुल्कावर 100 टक्के सूट देण्यात येणार आहे, जेणेकरून जोखीम कव्हर करता येईल, असं विमा कंपनीनं म्हटलं आहे. ज्या पॉलिसीधारकांना काही कारणास्तव प्रीमियम भरणे शक्य झाले नाही आणि त्यांची पॉलिसी बंद झाली, त्यांच्या फायद्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
लेट फीमध्ये 25 टक्के सवलत :
एलआयसीच्या म्हणण्यानुसार, एकूण 1 लाख रुपयांपर्यंतच्या प्रीमियमसाठी लेट फीमध्ये 25 टक्के सवलत दिली जाईल. जास्तीत जास्त सूट मर्यादा २,५०० रुपये आहे. त्याचबरोबर एक ते तीन लाख रुपयांच्या प्रिमियमसाठी जास्तीत जास्त सूट ३ हजार रुपये आहे. त्याचप्रमाणे ३ लाख रुपयांपेक्षा अधिक प्रीमियमवर लेट फीसमध्ये ३० टक्के सूट देण्यात येणार असून कमाल ३,५०० रु.ची सवलत देण्यात येणार आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: LIC Special Campaign to revive closed old policies check details 17 August 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL