23 November 2024 9:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Sovereign Gold Bond | स्वस्त सोने खरेदी करण्याची सुवर्ण संधी, UPI द्वारे खरेदी केल्यास अतिरिक्त सवलत देखील मिळेल

Sovereign Gold Bond

Sovereign Gold Bond | आरबीआयने सार्वभौम गोल्ड बाँड योजनेची दुसरी मालिका गुंतवणुकीसाठी नुकताच जाहीर केली आहे. 22 ऑगस्ट 2022 ते 26 ऑगस्ट 2022 या कालावधीत तुम्ही या गोल्ड बाँड मध्ये बँकेमार्फत गुंतवणूक करू शकता. तुम्ही ऑनलाइन म्हणजेच UPI द्वारे हे गोल्ड बाँड खरेदी केले तर RBI तुम्हाला त्यावर अतिरिक्त सवलत देईल.

सार्वभौम गोल्ड बाँड :
जर तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करायची असेल, तर RBI तुमच्या साठी घेऊन आले आहे सार्वभौम गोल्ड बाँड. तुम्ही या गोल्ड बाँड मध्ये गुंतवणूक करू शकता. आणि योजनेचे जबरदस्त फायदे मिळवू शकता. या आर्थिक वर्षातील ही दुसरी गोल्ड बाँड सरकारने गुंतवणुकी साठी खुली केली आहे. 22 ऑगस्ट 2022 ते 26 ऑगस्ट 2022 पर्यंत हा गोल्ड बाँड खरेदी साठी खुला असेल. या गोल्ड बाँड योजनेचे इतरही अनेक फायदे आहेत.

प्रति ग्रॅम किंमत :
22 ऑगस्टपासून म्हणजेच पुढील सोमवारपासून सुरू होणाऱ्या या गोल्ड बाँड विक्रीमध्ये तुम्ही काही ग्रॅमपासूनही ते हवे तेवढे वजनाचे सोने खरेदी करून त्यात गुंतवणूक करू शकता. मात्र, आरबीआयने या गोल्ड बाँडची अद्याप किंमती जाहीर केली नाही. गेल्या वेळी आरबीआयने 20 जून ते 23 जून या कालावधीत गोल्ड बोन विक्री साठी बाजारात आणले होते. त्यावेळी सोन्याचे मूल्य प्रति ग्रॅम 5091 रुपये होते. तर, ऑनलाइन खरेदीवर प्रती ग्राम 50 रुपयांची सूट मिळाली होती. म्हणजेच प्रति ग्रॅम सोन्याचा भाव फक्त 5041 रुपये होता.

 गोल्ड बाँड कसे खरेदी करावे? :
जर तुम्हाला सार्वभौम गोल्ड बाँड खरेदी करून त्यात मध्ये गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही तुमच्या बँक खात्यातूनही सहज सोने खरेदी करून या गोल्ड बाँड मध्ये गुंतवणूक करू शकता. याशिवाय तुम्ही तुमच्या डिमॅट खात्याशी गोल्ड बाँड लिंक केल्यास, तुम्ही मुदतपूर्तीपूर्वीच ते चालू बाजार दराने विकून चांगला नफा मिळवू शकता.

गुंतवणूक कालावधी :
गोल्ड बाँड मधील गुंतवणूक ही एक दीर्घकालीन गुंतवणूक मानली जाते. या गोल्ड बाँडची मॅच्युरिटी 8 वर्षे आहे. मात्र, तुम्ही 5 वर्षानंतरही तुम्हाला हवे तेव्हा ते विकून नफा मिळवू शकता.

व्याज परतावा :
या गोल्ड बाँड योजनेत गुंतवणूकदारांना 2.5 टक्के वार्षिक व्याज परतावाही दिले जाते. सार्वभौम गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला किमान 1 ग्रॅम वजनाचे सोने खरेदी करावे लागेल. सार्वभौम गोल्ड बाँडमध्ये दरवर्षी गुंतवणूक करण्यासाठी एक ठराविक कमाल गुंतवणूक मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. गुंतवणूक मर्यादा वैयक्तिक आणि HUF साठी कमाल 4 किलो, ट्रस्ट आणि इतर अशा संस्थांसाठी कमाल 20 किलो आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sovereign Gold Bond investment return with benefits on 17 August 2022.

हॅशटॅग्स

#Sovereign Gold Bond(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x