22 November 2024 7:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम
x

सरकारी बँका, कंपन्या नंतर मोदी सरकार नेहरूंनी उभारलेल्या देशातील पहिल्या सरकारी पंचतारांकित हॉटेलचे खासगीकरण करणार

The iconic hotel Ashok

The Ashok Hotel | देशातील पहिले सरकारी पंचतारांकित हॉटेल अशोक हॉटेल खासगी हातांच्या ताब्यात देण्याची केंद्र सरकारची तयारी आहे. या संदर्भात तयार करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार सरकार आता अशोक हॉटेलला ऑपरेट-मेंटेनन्स-डेव्हलपमेंट (ओएमडी) मॉडेल अंतर्गत ६० वर्षांसाठी भाडेतत्वावर देणार आहे. तसेच या हॉटेलची अतिरिक्त 6.3 एकर जागा व्यावसायिक कारणासाठी विकली जाणार आहे.

बिझनेस स्टँडर्डच्या एका रिपोर्टनुसार, हे हॉटेल १९६० च्या दशकात भारतात युनेस्कोच्या परिषदेसाठी बांधण्यात आलं होतं. मग ते बनवण्यासाठी तीन कोटी रुपये खर्च करण्यात आले. ११ एकरांत पसरलेले अशोक हॉटेल हे देशातील पहिले पंचतारांकित सरकारी हॉटेल होते. यात ५५० खोल्या, सुमारे दोन लाख चौरस फूट रिटेल व ऑफिसची जागा, ३० हजार चौरस फूट मेजवानी व कॉन्फरन्सची सुविधा आणि २५ हजार चौरस फुटांमध्ये पसरलेल्या आठ उपाहारगृहांचा समावेश आहे.

अशी आहे योजना :
अशोक हॉटेल आयटीडीसीच्या मालकीचे आहे. सरकारच्या प्रस्तावानुसार खासगी भागीदार या हॉटेलचा नव्याने विकास करू शकतो. जगातील सुप्रसिद्ध हेरिटेज हॉटेल्सच्या धर्तीवर हा विकास केला जाईल, असा दावा केला जात आहे. त्याच्या विकासासाठी नव्याने ४५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. एवढेच नव्हे तर हॉटेलजवळील ६.३ एकर अतिरिक्त जागेवर ६०० ते ७०० प्रीमियम सर्व्हिस अपार्टमेंट बांधण्यात येणार आहेत. ते डिझाईन-बिल्ड-फायनान्स-ऑपरेट आणि ट्रान्सफर मॉडेलद्वारे कमाई करतील.

युनेस्कोच्या परिषदेसाठी तयार करण्यात आले होते :
१९५५ साली तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू युनेस्कोच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे गेले होते. नेहरूंनी युनेस्कोला पुढची परिषद भारतात घेण्याचे निमंत्रण दिले, पण त्यानंतर नवी दिल्लीत जागतिक दर्जाचे हॉटेल नव्हते. त्यामुळे ती बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर त्याला ‘द अशोक’ असे नाव देण्यात आले. मुंबईस्थित आर्किटेक्ट बी.ई.डॉक्टर यांच्यावर त्याचे डिझाइन आणि बांधकाम करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. राणी एलिझाबेथ द्वितीय, मार्गारेट थॅचर, बिल क्लिंटन, चे ग्वेरा, फिडेल कॅस्ट्रो अशा अनेक नामवंत व्यक्तींनी या हॉटेलचा पाहुणचार घेतला.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: The iconic hotel that Nehru built will privatize by Modi government check details 19 August 2022.

हॅशटॅग्स

#The iconic hotel Ashok(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x