22 April 2025 2:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, चॉईस ब्रोकिंग फर्मने दिली अपडेट - NSE: SUZLON Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: YESBANK NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN Rattan Power Share Price | एक दिवसात 12 टक्क्यांनी वाढला पेनी स्टॉक, स्टॉक खरेदीला गर्दी, फायदा घ्या - NSE: RTNPOWER Tata Technologies Share Price | का तुटून पडत आहेत गुंतवणूकदार टाटा टेक शेअर्सवर? संधी सोडू नका - NSE: TATATECH
x

Multibagger Stocks | धमाकेदार शेअर, दीड वर्षात गुंतवणूक 41 पटीने वाढली, हा स्टॉक भविष्यातही मोठा परतावा देऊ शकतो

Multibagger Stock

Multibagger Stocks | गुंतवणुकीच्या सुरुवातीला मल्टीबॅगर शेअर्स शोधणे नेहमीच थोडे अवघड काम असते. किरकोळ गुंतवणूकदारांना अश्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करताना नेहमी भीती वाटते, की शेअर बाजारात गोष्टी वेगाने बदलू शकतात. काही स्टॉक संभाव्य मल्टीबॅगर स्टॉकही असू शकतात पण, ते शोधणे आणि त्यातले चांगले स्टॉक निवडणे खूप कठीण होऊ शकते. या लेखात आम्ही तुम्हाला तुम्हाला अशाच एका जबरदस्त स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने फक्त दीड वर्षात भागधारकांना तब्बल 41 पट अधिक परतावा मिळवून दिला आहे.

हा स्टॉक आहे EKI एनर्जी. आपण ह्या लेखात EKI एनर्जी बद्दल माहिती घेणार आहोत. EKI एनर्जीचा स्टॉक हा जवळपास 1.5 वर्षांपासून जॅकपॉट परतावा देणारा स्टॉक बनला आहे. 9 एप्रिल 2021 हा स्टॉक बीएसईवर 40.51 रुपयांला ट्रेड करत होता, तर आज ह्या स्टॉक ची किंमत तब्बल 1673 रुपयांवर गेली आहे. या कालावधीत ह्या स्टॉकने आपल्या भागधारकांना सुमारे 4029.47 टक्के परतावा मिळवून दिला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी गुंतवलेले 1 लाख रुपये आता 41 लाख रुपये झाले आहेत.

1 वर्षाचा परतावा :
18 ऑगस्ट 2021 रोजी EKI एनर्जीचा स्टॉक 431.91 रुपये या किमतीवर ट्रेड करत होता. तर आता एका शेअरची किंमत 1673 रुपयांवर गेली आहे. म्हणजेच या शेअर्सनी फक्त 1 वर्षात 3 पट अधिक पैसा कमवला आहे. मागील 1 वर्षात या शेअर्सने 287.31 टक्के परतावा देऊन 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 3.87 लाख रुपये परतावा दिला आहे.

शेअर्स मध्ये सकारात्मक वाढ :
मागील काही काळापासून आता स्टॉक मध्ये थोडी कमी पडझड होत आहे. चालू वर्षात 2022 मध्ये आतापर्यंत शेअर मध्ये 35.81 टक्क्यांची घसरण पाहायला मिळली होती. शेअर्स चा मागील 6 महिन्यांचा परतावा 23.27 टक्के नकारात्मक राहिला आहे. मागील 1 महिन्यात नकारात्मक परतावा 14.42 टक्के झाला आहे.

तिमाही निकाल आकडेवारी :
कंपनीने 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या तिमाही कालावधीत तब्बल 475.7207 कोटी रुपयांच्या तुलनेत 30 जून 2022 रोजी संपलेल्या कालावधीत 508.5935 कोटी रुपयांची एकूण कमाई केली आहे. म्हणजेच, त्याच्या उत्पन्नात सुमारे 7 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. या कंपनीने 30 जून 2022 रोजी संपलेल्या कालावधीत 106.9841 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या तिमाही कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा 105.1726 कोटी रुपये होता. म्हणजेच त्याच्या नफ्यात तब्बल 1.72 टक्क्यांची वाढ झाली आहे.

कंपनीची बद्दल सविस्तर :
EKI Energy Services Limited ही भारतातील एक आघाडीची जागतिक सेवा प्रदाता कंपनी आहे. कंपनी व्यावसायिक सेवांसह हवामान बदल सल्लागार आणि कार्बन सेटिंगच्या उद्योगात गुंतली आहे. भारताचे वॉरन बफे म्हणून ओळखले जाणारे बिग बुल राकेश झुनझुनवाला यांचे नुकतेच दुर्दैवी निधन झाले. राकेश झुनझुनवाला यांचा शेअर्स च्या बाबतीत एक फंडा होता, तो म्हणजे “शेअर्स खरेदी करून दीर्घ कालावधी साठी होल्ड करणे” यावर त्यांचा नेहमीच विश्वास होता.

राकेश झुनझुनवाला नवीन गुंतवणूकदारांना नेहमी सल्ला देत असत की, संशोधन करा, योग्य स्टॉक खरेदी करा आणि नंतर दीर्घ काळासाठी ते होल्ड करून ठेवा, कंपनीच्या व्यवसायावर आणि कामगिरीवर विश्वास ठेवा. घाबरून हडबडीमध्ये गुंतवणुकीत खरेदी विक्रीचे निर्णय घेऊ नका. राकेश झुनझुनवाला एका दिवसात श्रीमंत झाले नव्हते. ते ज्या यशाच्या शिखरावर पोहोचला होते तिथे पोहोचण्यासाठी अनेक वर्षांचे संशोधन, परिश्रम आणि संयम लागतो. झुनझुनवाला यांचा पोर्टफोलिओ 25 ते 30 टक्के पेक्षा जास्तने अनेक वेळा घसरला होता, परंतु त्यांनी या घसरणीचा नेहमी खरेदीची संधी म्हणून उपयोग केला. तुम्ही तसेच या कंपनीच्या शेअरमध्येही नियोजन आणि संशोधन करून गुंतवणूक करावी.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks EKI energy services limited share price return on 19 August 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या