22 November 2024 6:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Vehicle Toll Plate | आता वाहनात टोल प्लेट बसवणार, नंबर प्लेट सिस्टीम बदलणार, तुम्हाला कमी पैसे मोजावे लागणार

Vehicle Toll Plate

Vehicle Toll Plate | भारतात टोल प्लेट लागू होणार आहे. भारतातील वाहतूक सुविधा वाढवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) सातत्याने कार्यरत आहे. नितीन गडकरी यांचे अनेक प्रयोग वेळोवेळी चर्चेत असतात.

भारतात नव्या पद्धतीने टोल वसूल करणार – टोल प्लेट
आता भारताचे रस्ते वाहतूक मंत्री भारताच्या टोल प्रणालीत बदल करण्यासाठी अनेक पर्यायांचा विचार करत असून या सर्व व्यवस्थेत जीपीएस टोल प्रणाली आणि नवीन नंबर प्लेट प्रणाली लागू करण्याची चर्चा आहे.

जीपीएस यंत्रणा बसवणार – टोल काढणार
नितीन गडकरी म्हणाले की, सध्या आमच्याकडे टोलवसुलीची यंत्रणा आहे, मात्र आम्ही दोन पर्यायांवर काम करत आहोत. सॅटेलाइट बेस्ड टोल-सिस्टिममध्ये जीपीएस गाडीमध्ये बसवण्यात येणार असून, त्यातून टोल कापला जाईल, असा पर्याय आहे.

एक नवीन नंबर प्लेट दिसू शकते :
आता नव्या प्रकारच्या नंबर प्लेट बनवण्याच्या तंत्रावर काम सुरू झाले आहे. आता निर्मात्याला ही नंबर प्लेट लावणे बंधनकारक असणार आहे. सर्व जुन्या नंबर प्लेटच्या जागी नवीन नंबर प्लेट बसवण्यात येणार असून, यामध्ये नंबर प्लेटमध्ये ऑटो फिटेड जीपीएस सिस्टिम असणार आहे. नवीन नंबर प्लेटसोबत एक सॉफ्टवेअर जोडले जाईल जेणेकरून टोल आपोआप कापला जाईल.

लांबच लांब रांगांपासून सुटका होणार :
यामुळे लांबच लांब रांगांपासून सुटका होणार असून त्याचबरोबर कामाच्या प्रवासासाठीही कमी पैसे मोजावे लागणार असल्याची माहिती आहे. उलट आजच्या काळात कमी अंतराच्या रस्त्याच्या वापरावर अधिक टोल भरावा लागतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Vehicle Toll Plate there will be change number plate system check details 20 August 2022.

हॅशटॅग्स

#Vehicle Toll Plate(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x