22 November 2024 6:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम
x

Inflation Effect | प्रचंड महागाई, बेरोजगारीमुळे लोकं मोदींच्या नावाने मतं देणार नाहीत, म्हणून स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा वापर?

Inflation Effect

Inflation Effect | महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीचा काळ आता काहीसा मंदावला असेल, पण वक्तृत्वाचा काळ अद्याप शांत झालेला नाही. या भागात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यमान उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. इतकंच नाही तर यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींचा उल्लेखही केला. उद्धव ठाकरे म्हणाले की, फडणवीस बाळासाहेबांच्या नावावर मते मागत असल्याने आता मोदी युग संपलेले दिसते.

महापालिकेच्या निवडणुकांवरून भाजप नेत्यांकडून सामान्यांच्या प्रश्नांना बगल?
मुळात या देशाला मागील ८ वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वप्नं दाखवत आहेत हे वास्तव आहे. मात्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर महागाई, बेरोजगारी, ढासळलेल्या रुपयाची डॉलरच्या तुलनेतील किंमत आणि ढासळलेली अर्थव्यवस्था हे विषय अत्यंत गंभीर झाले आहेत आणि त्याचा थेट परिणाम जनतेवर झाला आहे. निवडणुका महानगरपालिकेच्या असल्या तरी सामान्य मुंबईकरांपासून ते देशातील जनतेपर्यंत सर्वजण महागाई आणि बेरोजगारीची त्रस्त आहेत. हेच मुद्दे भाजपच्या वरिष्ठांसाठी डोकेदुखी झाले आहेत. त्यामुळे लोकांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने मतं मागितल्यास उलट मतदार भाजपवर भडास काढेल अशी शक्यता आहे. याची राज्यातील भाजप नेत्यांना जाणीव असल्याने आता मराठी माणसाला भावून मुद्यांतून म्हणजे स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने भाषणं देऊन मत मागितली जातील असे संकेत मिळू लागले आहेत.

मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्ट नेते भाजप सोबत :
शिवसेनेच्या ज्या नेत्यांवर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप करून ईडी चौकशीत अडकवले होते ते आ. प्रताप सरनाईक, आ, यामिनी जाधव, नगरसेवक यशवंत जाधव आणि खा. भावना गवळी शिंदे गटामार्फत भाजपच्या युतीत सामील झाल्याने आता भाजपने भष्टाचारवर बोलण्याचा अधिकारच गमावला आहे. मुंबई तीळ गल्लो-गाली किरीट सोमैया, देवेंद्र फडणवीस आणि या नेत्यांच्या युतीचे पोष्टर्स लावले तरी निम्मी मतं हातून जातील.

उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा हेतू ओळखला :
खरंतर, देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच बृहन्मुंबई महानगरपालिका महापालिकेच्या निवडणुकीत विजय मिळवून बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण करण्याविषयी भाष्य केलं होतं. बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-भाजप युती सरकारची आहे, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, फडणवीस यांनी मुंबईत भाषण करताना बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महापालिकेच्या सत्तेची गरज असल्याचे सांगितले. असं म्हणत ते बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मतं मागू पाहत आहेत. मोदींच्या नावाचा वापर आता करून काही फायदा होणार नाही, हेही यातून सूचित होते. ‘मोदी युग’ संपल्याचे हे लक्षण असून, आपण ते मान्य केले आहे, असे ठाकरे म्हणाले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Inflation Effect in BMC Election 2022 check details 21 August 2022.

हॅशटॅग्स

#Inflation Effect(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x