26 November 2024 5:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ladki Bahin Yojana | सरकारकडून लाडक्या बहिणींना देण्यात येणार रिटर्न गिफ्ट, आता 2100 रुपये मिळणार - Marathi News Salary Management | बचतीचा महामंत्र, तुमचा सुद्धा पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, या ट्रिक्स फॉलो करा, फायदा घ्या Penny Stocks | 7 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 26.54% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: DIL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर किती चार्जेस द्यावे लागतात - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेजिंग - NSE: IRB SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SJVN
x

Mutual Fund Scheme | या मल्टी कॅप म्युचुअल फंडांतून गुंतवणूकदारांची जोरदार कमाई, तुम्हीही SIP मार्फत पैसा वाढवू शकता

mutual fund

Mutual Fund Scheme | मल्टीकॅप म्युचुअल फंडांनी मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 26 टक्के दराने परतावा दिला आहे. तर फ्लेक्सी कॅप म्यूची फंडांनी फक्त 20 टक्के वार्षिक परतावा दिला आहे.

टॉप 5 मल्टी कॅप फंड :
म्युच्युअल फंडांमधील मल्टीकॅप म्युचुअल फंड आजकाल लहान मोठ्या सर्व गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेत आहेत. SBI मल्टीकॅप NFO ने आपल्या गुंतवणूकदारांकडून तब्बल 8,000 कोटी रुपये गुंतवणूक जमा केली आहे. मल्टीकॅप म्युचुअल फंड गुंतवणूक बाजारात लार्ज कॅप, स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये 25-25 टक्के गुंतवणूक करतात. आणि म्हणूनच मल्टीकॅप म्युचुअल फंड गुंतवणूकदारांसाठी बेस्ट गुंतवणूक पर्याय उपलब्ध करून देतात. मल्टीकॅप म्युचुअल फंडांनी मागील एका वर्षात सरासरी 26 टक्के अधिक नफा कमावला आहे. तर फ्लेक्सी कॅप म्युचुअल फंडांनी फक्त 20 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

मल्टी कॅप म्युचुअल फंडांमध्ये गुंतवणूक का करावी?
जर तुम्हाला दीर्घ कालावधीत छोट्या गुंतवणुकीतून भरघोस नफा कमवायचा असेल, तर म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीपेक्षा इतर कोणताही चांगला पर्याय असू शकत नाही. बाजार कधी घसरेल किंवा किती वाढेल, याचा अंदाज कोणीही लावू शकतो. पण भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढेल, त्यामुळे साहजिकच शेअर बाजार आगामी काळात नवीन उंचीवर पोहोचेल, असा विश्वास आर्थिक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अशा वेळी, जर तुम्हाला सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP द्वारे म्युच्युअल फंडांमध्ये पैसे लावायचे असेल, तर तुम्ही मल्टी कॅप म्युच्युअल फंडांमध्ये नक्की गुंतवणूक करावी. मल्टी कॅप म्युचुअल फंड सर्व स्टॉकमध्ये गुंतवणूक करतात लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप मग ते कोणतही असो.

आम्ही तुमच्यासाठी असे पाच जबरदस्त मल्टी कॅप म्युचुअल फंड घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये तुम्ही सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन द्वारे गुंतवणूक सुरू करू शकता.

क्वांट अॅक्टिव्ह फंड – डायरेक्ट प्लॅन :
क्वांट अॅक्टिव्ह फंड – डायरेक्ट प्लॅन हा भारतातील सर्वोत्तम मल्टी कॅप म्युचुअल फंडांपैकी एक आहे. 2013 मध्ये सुरू झालेल्या या म्युचुअल फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 21.28 टक्के या दराने परतावा दिला आहे. क्वांट अॅक्टिव्ह फंड डायरेक्ट प्लॅनने मागील 1 वर्षात 32.14 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या म्युचुअल फंडाने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 34.27 टक्के परतावा मिळवून दिला आहे. मागील 5 वर्षांत फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना 23.75 टक्के परतावा मिळवून दिला आहे. 2 मे 2022 रोजी या म्युचुअल फंडची नेट अॅसेट व्हॅल्यू म्हणजे निव्वळ मालमत्ता मूल्य 446.22 रुपये प्रति युनिट आहे.

सुंदरम इक्विटी फंड – डायरेक्ट प्लॅन :
सुंदरम इक्विटी फंड – डायरेक्ट प्लॅनने अलिकडच्या काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. या म्युचुअल फंडाने लाँच झाल्यापासून आतापर्यंत तब्बल 16.31 टक्के परतावा कमावला दिला आहे. सुंदरम इक्विटी फंड – डायरेक्ट प्लॅनने मागील 1 वर्षात 25.55 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या म्युचुअल फंडाने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 17.09 टक्के परतावा मिळवून दिला आहे. मागील 5 वर्षांत, या म्युचुअल फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 13.07 टक्के परतावा मिळवून दिला आहे. 2 मे 2022 रोजी त्याची NAV म्हणजे नेट अॅसेट व्हॅल्यू प्रति युनिट 248.94 रुपये होती.

इन्वेस्को इंडिया मल्टीकॅप फंड-डायरेक्ट प्लॅन :
इन्व्हेस्को इंडिया मल्टीकॅप फंड – डायरेक्ट प्लॅनची ​​देखील टॉप मल्टी कॅप म्युचुअल फंडांमध्ये गणना होते. या म्युचुअल फंडाने सुरुवातीपासून आतापर्यंत वार्षिक सरासरी तब्बल 18.12 टक्के परतावा मिळवून दिला आहे. Invesco India Multicap Fund – डायरेक्ट प्लॅनने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 18.85 टक्के वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. या म्युचुअल फंडाने मागील 3 वर्षात वार्षिक सरासरी 18.44 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या म्युचुअल फंडाने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 12.29 टक्के जोरदार परतावा मिळवून दिला आहे. 2 मे 2022 रोजी या म्युचुअल फंडची NAV म्हणजे नेट अॅसेट व्हॅल्यू प्रति युनिट 84.64 रुपये होती.

ICICI प्रुडेन्शियल मल्टीकॅप फंड-डायरेक्ट प्लॅन:
ICICI प्रुडेन्शियल मल्टीकॅप फंड-डायरेक्ट प्लॅन देखील टॉप मल्टी कॅप म्युचुअल फंडांमध्ये लोकप्रिय आहे. या म्युचुअल फंडाने सुरुवातीपासून आतापर्यंत जवळपास 15.41 टक्के परतावा कमावून दिला आहे. ICICI प्रुडेंशियल मल्टीकॅप फंड डायरेक्ट प्लॅनने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 21.92 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंडाने मागील 3 वर्षात तब्बल 14.98 टक्के परतावा मिळवून दिला आहे. मागील 5 वर्षांत, या म्युचुअल फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी 12.10 टक्के या दराने परतावा कमावून दिला आहे. 2 मे 2022 रोजी या म्युचुअल फंड ची नेट अॅसेट व्हॅल्यू म्हणजे निव्वळ मालमत्ता मूल्य रुपये 471.87 प्रति युनिट आहे.

निप्पॉन इंडिया मल्टी कॅप फंड-डायरेक्ट प्लॅन :
निप्पॉन इंडिया मल्टी कॅप फंड – डायरेक्ट प्लॅन आपल्या टॉप सर्वोत्तम मल्टी कॅप म्युचुअल फंडांच्या यादीत समाविष्ट आहे. हा म्युचुअल फंड सुरू झाल्यापासून आतापर्यंत या म्युचुअल फंडने आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 14.58 टक्के या दराने भरघोस परतावा दिला आहे. निप्पॉन इंडिया मल्टी कॅप फंड डायरेक्ट प्लॅनने मागील 1 वर्षात 33.67 टक्के या दराने परतावा मिळवून दिला आहे. या म्युचुअल फंडाने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 16.05 टक्के परतावा मिळवून दिला आहे. मागील 5 वर्षांत, या म्युचुअल फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 13.39 टक्के सरासरी वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. 2 मे 2022 रोजी या म्युचुअल फंडची नेट अॅसेट व्हॅल्यू म्हणजे निव्वळ मालमत्ता मूल्य 160.20 रुपये प्रति युनिट आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mutual Funds direct plan for long term investment on 22 August 2022.

हॅशटॅग्स

mutual fund(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x