16 April 2025 2:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
x

Investment Plan | फायद्याची जबरदस्त योजना, गुंतवणुकीवर तुम्हाला मिळतील 28 लाख रुपयांचा परतावा, योजना समजून घ्या

Investment plan

Investment Plan| लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ज्याला आपण LIC म्हणून देखील ओळखतो, ही भारतातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी आहे. LIC आपल्या ग्राहकांसाठी नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना जाहीर करत असते. ज्येष्ठ नागरिकांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांसाठी एलआयसीने बाजारात नवनवीन योजना सुरू केल्या आहेत. ही पॉलिसी योजनेत गुंतवणूक करून सर्व वयोगटातील व्यक्ती आपले आर्थिक भविष्य सुरक्षित करू शकतात. अशीच एक योजना LIC घेऊन आली आहे त्याचे नाव आहे, “LIC जीवन प्रगती योजना”. या योजनेत तुम्ही दररोज फक्त 200 रुपये गुंतवणूक करून मुदत पूर्तीच्या वेळी तब्बल 28 लाख रुपयांचा परतावा मिळवू शकता. तुम्ही एलआयसी मध्ये गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुम्ही एलआयसी जीवन प्रगती योजनेबद्दल नक्कीच जाणून घेतले पाहिजे.

या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला 28 लाख रुपये परतावा मिळवण्यासाठी दररोज फक्त 200 रुपये गुंतवणूक करायची आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला आयुष्यभर आर्थिक संरक्षणासह जबरदस्त परतावा देखील मिळेल. जर तुम्ही या योजनेत दररोज 200 रुपये टाकले, म्हणजे महिन्याला तुमची 6 हजार रुपये बचत होईल आणि तुम्ही संपूर्ण 20 वर्षे गुंतवणूक करत गेलात तर मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर तुम्हाला तब्बल 28 लाखांची संपूर्ण रक्कम परताव्यासह मिळेल. यासोबतच तुम्हाला लाईफ रिस्क कव्हरही मिळेल.

पाच वर्षांत जोखीम कव्हर :
या पॉलिसीचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये गुंतवणूकदारांचे जोखीम कव्हर दर पाच वर्षांनी वाढवले जाते. म्हणजेच तुम्हाला मिळणारी एकूण परतावा रक्कम दर 5 वर्षांनी आपोआप वाढवली जाईल. पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर विम्याची संपूर्ण रक्कम सिंपल रिव्हर्शनरी बोनस आणि फायनल बोनस एकत्र करून पूर्ण रक्कम दिली जाईल.

व्याप्ती कशी वाढते?
या पॉलिसीमध्ये कालावधी किमान 12 वर्षे आणि कमाल 20 वर्षे असेल.12 वर्षे ते 45 वर्षे वयोगटातील कोणीही व्यक्ती ह्या पॉलिसीमध्ये पैसे टाकू शकतात. तुम्ही 3, 6, 9, 12 महिन्यांसाठी या पॉलिसीमध्ये पैसे जमा करू शकता. या पॉलिसीची किमान विमा रक्कम 1.5 लाख रुपये असून यात कोणतीही कमाल मर्यादा नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Investment Plan of LIC Jeevan Pragati Policy benefits for long terms on 23 August 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Investment Plan(8)#LIC(66)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या