Post Office Investment | पैसे दुप्पट करण्यासाठी गुंतवणूक करा पोस्ट ऑफिसच्या या धमाकेदार योजनेत, संयम देईल भरघोस परतावा

Post Office Investment | जर तुम्ही बचत करण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिस बचत योजना तुमच्यासाठी बेस्ट परतावा देणारी योजना ठरू शकते. या योजनेत गुंतवणूक केल्याने तुम्हाला आयकर मध्ये सवलतही मिळेल.
पोस्ट ऑफिस गुंतवणूक योजना : जर तुम्ही बचती करून गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या या विशेष बचत योजनेबद्दल जाणून घ्या. तुमच्यासाठी फायदेशीर राहील. या योजनांद्वारे तुम्ही दरमहा चांगले उत्पन्नही कमवू शकता. या योजनांमध्ये राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे (NSC), पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट (POTD) आणि किसान विकास पत्र (KVP) अश्या जबरदस्त योजनांचा समावेश होतो. गुंतवणुकीतून जबरदस्त परतावा देणाऱ्या या अत्यंत फायदेशीर योजनांबद्दल सर्व माहिती या लेखात जाणून घेऊ
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे :
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) मधील गुंतवणुकीवर वार्षिक 6.8 टक्के या दराने व्याज परतावा दिला जातो. तसेच, तुमच्या पैशवरील व्याजाची गणना दर वार्षिक आधारावर केली जाते. त्याच वेळी, गुंतवणुकीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला व्याजाची पूर्ण रक्कम दिली जाईल. या योजनेत किमान एक हजार रुपयेपासुन गुंतवणूक सुरू करता येते. पोस्ट ऑफीसच्या या योजनेत गुंतवणुकीसाठी कोणतीही कमाल मर्यादा उपलब्ध नाही. पोस्ट ऑफिसच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेंतर्गत एकूण गुंतवणुकीचा कमाल कालावधी 5 वर्षे असेल. इंडिया पोस्टनुसार, या योजनेअंतर्गत किमान 100 रुपयांमध्ये खाते उघडता येते.
पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट :
जसे तुम्ही बँकेत FD गुंतवणूक करता, तसेच तुम्ही पोस्ट ऑफिसमध्येही एफडी गुंतवणूक करू शकता. ही योजना टर्म डिपॉझिट या नावाने पोस्ट ऑफिसमध्ये राबवली जाते. या योजनेमध्ये 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे आणि 5 वर्षे पैसे जमा करून गुंतवणूक करता येते. या योजनेतील गुंतवणुकीवर फायदा असा आहे की येथे मिळणारे एफडीवरील व्याजदर बँकेपेक्षा खूप अधिक आहे.
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेअंतर्गत, 5 वर्षांच्या ठेवींवर 6.7 टक्के या दराने वार्षिक व्याज परतावा दिला जातो. आयकर कायदा कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ पाच वर्षांच्या मुदत ठेवीवर देण्यात आला आहे. पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजना खात्यात रोख किंवा धनादेशाद्वारे पैसे जमा करता येतात.
किसान विकास पत्र :
तुम्हाला तुमची गुंतवणूक रक्कम दुप्पट करून भरघोस पैसे कमवायचे असेल, तर किसन विकास पत्र ही योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम योजना राहील. इतर लहान बचत योजनांच्या तुलनेत किसन विकास पत्र योजनेत जास्त व्याज परतावा दिला जातो. सरकार दर तिमाहीत या योजनेतील व्याज दराचा आढावा घेते. अशा प्रकारे गुंतवलेले पैसे कधी दुप्पट होतील सरकारद्वारे जाहीर केलेल्या व्याजदरांवर अवलंबून असते.
आर्थिक वर्ष 2021 च्या पहिल्या तिमाहीत KVP योजनेसाठी व्याज दर 6.9 टक्के निश्चित करण्यात आला होता. या योजनेत तुमची गुंतवणूक दुप्पट होण्यास १२४ महिने लागतील. या खात्यात एक लाख रुपये एकरकमी गुंतवल्यास, तुम्हाला मुदतपूर्तीवर 2 लाख रुपये परतावा म्हणून परत मिळतील. या योजनेचा मुदत पूर्ती कालावधी 124 महिने असतो. ही योजना आयकर कायदा 80C अंतर्गत येत नाही. त्यामुळे कोणताही परतावा आल्यावर तुम्हाला त्यावर कर आकारला जाईल. मात्र, या योजनेत टीडीएस कपात केली जाणार नाही.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Post Office Investment schemes for higher return in short term on 23 August 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK
-
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक अजून घसरणार, ग्लोबल फर्मने दिला अलर्ट, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA