22 November 2024 11:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

बिहारमध्ये भाजपाची सत्ता जाताच ईडी, सीबीआयचा पारा चढला? | निमलष्करी दल घेऊन विरोधक आमदार, खासदारांच्या घरी धाडसत्र

RJD MLC Sunil Singh

Bihar Political Crisis | बिहारमधील नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकारच्या फ्लोअर टेस्टपूर्वी सीबीआयने राष्ट्रीय जनता दलाचे खासदार अशफाक करीम आणि एमएलसी सुनील सिंह यांच्या घरावर छापे टाकले आहेत. बुधवारी सकाळी सीबीआयचं पथक अशफाक करीम आणि सुनील सिंग यांच्या घरांवर छापा टाकण्यासाठी पटना इथं दाखल झालं. कथित लँड फॉर जॉब घोटाळ्यात हा छापा टाकण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे. सुनील सिंह हे राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांचे निकटवर्तीय आहेत. जाणून घेऊयात नितीश सरकारला आज विधानसभेत बहुमत सिद्ध करायचं आहे.

माहितीनुसार, बुधवारी सकाळी आठच्या सुमारास सीबीआयचं पथक सुनील सिंह यांच्या पाटणा येथील निवासस्थानी पोहोचले. सीबीआयच्या अधिकाऱ्यांसोबत सुरक्षा दलेही उपस्थित आहेत. आरजेडीचे खासदार अशफाक करीम यांच्या घरीही सीबीआयची टीम पोहोचली आहे. मात्र, अद्याप त्याला दुजोरा मिळालेला नाही.

नितीश सरकारची आज विधानसभेत बहुमत चाचणी :
बिहार विधानसभेतील महाआघाडी सरकारच्या बहुमत चाचणीपूर्वीच सीबीआयची ही कारवाई झाली आहे. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर बुधवारी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले असून, त्यात नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. यासोबतच सभापती विजय सिन्हा यांच्याविरोधात आणलेल्या अविश्वास ठरावावरही मतदान होणार आहे.

नोकरी घोटाळ्यासाठी जमीन म्हणजे काय :
सीबीआयने माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव, त्यांच्या पत्नी राबडीदेवी, दोन मुली, नोकरशहा आणि काही खासगी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला होता. लालू यादव यांच्या रेल्वेमंत्रीपदाच्या कार्यकाळात रेल्वेत ग्रुप डीच्या पदांवर लोकांना नोकऱ्या देण्यात आल्या, त्याबदल्यात लालू कुटुंबियांच्या नावावर जमीन करण्यात आली, असा आरोप आहे. त्या पदांच्या भरतीसाठी रेल्वेकडून कोणतीही अधिसूचना जारी करण्यात आली नसल्याचे तपासात समोर आले आहे. या कथित घोटाळ्यात लालू कुटुंबियांच्या नावावर एक लाख चौरस फुटांपेक्षा जास्त जमीन मिळाली होती. याआधी सीबीआयने लालू कुटुंबीयांच्या घरावरही छापे टाकले होते. गेल्या महिन्यात लालू यादव यांचे माजी ओएसडी भोला यादव यांना सीबीआयने याप्रकरणी अटक केली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: RJD MLC Sunil Singh house raided by CBI before CM Nitish Government floor test in Bihar assembly check details 24 August 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x