15 November 2024 8:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

Multibagger Stocks | मिळाला 3400 टक्क्यांचा जबरदस्त परतावा, आता 650 टक्के लाभांश मिळणार, या शेअरचे गुंतवणूकदार मालामाल

Multibagger Stock

Multibagger Stocks| सध्या शेअर बाजारात अनेक कंपन्या एक से बढकर एक लाभांश जाहीर करत आहेत. आता Procter & Gamble Hygiene & Healthcare Ltd या कंपनीने देखील आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त लाभांश जाहीर केला आहे. कंपनी आपल्या भागधारकांना 650 टक्के लाभांश देणार आहे.

सध्या शेअर बाजारात अनेक कंपन्यानी लाभांश जाहीर करण्याचा सपाटा सुरू केला आहे. अशी एक कंपनी Procter & Gamble Hygiene & Healthcare Ltd ने देखील आपल्या भागधारकांना लाभांश जाहीर केले आहे. कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 650 टक्के लाभांश वितरित करेल. कंपनीचे बाजार भांडवल 46,871 कोटी रुपये आहे. प्रॉक्टर अँड गॅम्बल हायजीन अँड हेल्थकेअर लिमिटेड ही एक मोठा बाजार भांडवल असलेली कंपनी आहे. 9 जुलै 2004 रोजी कंपनी NSE वर सूचीबद्ध झाली होती, तेव्हापासून आत्तापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 3454.40 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.

कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, ‘आम्हाला कळविण्यात आनंद होत आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत संचालक मंडळाच्या सदस्यांनी 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्सवर 65 रुपये लाभांश जाहीर केला आहे. कंपनीच्या 58 व्या सर्वसाधारण सभेत प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर हा लाभांश 15 नोव्हेंबर 2022 ते 13 डिसेंबर 2022 दरम्यान वितरीत केला जाईल. म्हणजेच, पात्र गुंतवणूकदारांना प्रती शेअर 650 टक्के लाभांश दिला जाईल. आम्ही ही FMSG क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या निकालानुसार कंपनीचा महसूल 776 कोटी रुपये नोंदवण्यात आला होता. तर एका वर्षापूर्वी या तिमाहीत कंपनीने 782 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. म्हणजेच मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 1.27 टक्क्यांनी घट झाली आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीचा एकूण खर्च वाढला असून 724 कोटी रुपयेवर गेला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीला 43 कोटी रुपयांचा नफा झाला होता. जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीपेक्षा 13 टक्के कमी नोंदवले गेले आहे.

स्टॉकची कामगिरी :
प्रॉक्टर अँड गॅम्बल हायजीन अँड हेल्थ केअर कंपनीचे शेअर्स 14,492 रुपये किमतीवर बंद झाले. मागील पाच वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये 74.29 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. मागील वर्षभरात या कंपनीच्या शेअर्समध्ये 13.61 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. या वर्षातील आतापर्यंतची कामगिरी पहिली तर या कालावधीत ह्या स्टॉकमध्ये 6.26 टक्क्यांची घसरण झाली आहे. मागील वर्षाची कामगिरी पाहता या शेअर्सच्या किमतीत 0.80 टक्क्यांची वाढ झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks Procter & Gamble Hygiene & Healthcare share price return on 24 August 2022

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x