23 November 2024 5:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

एकीकडे शेतकरी, मराठा तरुणांचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न | दुसरीकडे विधीमंडळाच्या पायऱ्यांवर शिंदे समर्थकांनी भाईगिरी

CM Eknath Shinde

Maharashtra Assembly | महाराष्ट्राच्या विधीमंडळात आज अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. पावसाळी अधिवेशनात महत्त्वाचे विषय बोलायचे सोडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आमदार एकमेकांविरोधात भिडल्याचं चित्र अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. मात्र विषय भरकटवण्याचा हा सत्ताधाऱ्याचा डाव असल्याचा आरोप विरोधकांनी केली आला आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या सुरूवातीपासूनच विधानभवनाच्या पायऱ्यांवरील आंदोलन चर्चेचा विषय ठरत आहे. शिवसेनेच्या ४० बंडखोर आमदारांसह भाजपविरोधात शिवसेनेसह महाविकास आघाडीतील आमदार दररोज पायऱ्यांवर घोषणाबाजी करताना दिसून येत आहे. आज याच पायऱ्यांवर शिंदे गटातील आमदारांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत घोषणाबाजी सुरू केली होती. याचवेळी दोन्ही बाजूंचे आमदार आमने-सामने आले आणि जोरदार राडा झाला.

दररोज विधानभवनाच्या पायऱ्यावर शिवसेनेच्या आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आमदार पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसांपासून शिंदे गटाविरुद्ध घोषणाबाजी होताना दिसतेय. आज शिंदे गटातील आमदारांनी बॅनर घेऊन पायऱ्यांवर घोषणाबाजी सुरू केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि महेश शिंदे यांच्या शाब्दिक खटका उडाला. झटापट सुरू असतानाच धक्काबुक्की करायची नाही, असं अमोल मिटकरी म्हणाले. त्यानंतर रोहित पवार, भरत गोगावले, प्रताप सरनाईक, अजित पवार यांनी मध्यस्थी केली. मात्र त्यात आमदार दिलीप लांडे हे अति उन्मत्तपणा दाखवताना दिसले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Maharashtra Assembly monsoon session CM Eknath Shinde supporters attacked on opposition leaders 24 August 2022.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x