26 November 2024 12:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ladki Bahin Yojana | सरकारकडून लाडक्या बहिणींना देण्यात येणार रिटर्न गिफ्ट, आता 2100 रुपये मिळणार - Marathi News Salary Management | बचतीचा महामंत्र, तुमचा सुद्धा पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, या ट्रिक्स फॉलो करा, फायदा घ्या Penny Stocks | 7 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 26.54% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: DIL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर किती चार्जेस द्यावे लागतात - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेजिंग - NSE: IRB SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SJVN
x

Mutual Funds | दरमहा म्युच्युअल फंडात 10 हजार रुपये SIP गुंतवणूक करा, दीर्घकालीन बचतीवर तुम्हाला इतका छप्परफाड परतावा मिळेल

Mutual funds

Mutual Funds | जर तुम्ही 3 वर्षांपूर्वी क्वांट स्मॉल कॅप फंडच्या डायरेक्ट प्लॅनमध्ये दरमहा 10,000 रुपयेची SIP गुंतवणूक सुरू केली असती, तर त्यावर तुम्हाला आज 6.44 लाख रुपये परतावा मिळाला असता.

पैसे गुंतवण्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे एसआयपी:
‘रिस्क है तो इश्क है’ हितेश मेहता या प्रसिद्ध वेब सीरिजचा एक डायलॉग आहे. गुंतवणुकदारांना नुसती पैशाची ओढ नसते,त्यांना गुंतवणुकीत सुरक्षा देखील हवी असते. गुंतवणूक तज्ञ नेहमी म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना दीर्घकालीन परतावा कमावण्यासाठी स्मॉल कॅप म्युचुअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. त्यांचा असा विश्वास असतो की दीर्घकालीन स्मॉल-कॅप म्युचुअल फंड मध्यम आणि लहान-मुदतीच्या योजनांपेक्षा जबरदस्त अधिक परतावा देतात.

येथे गुंतवणूक करा :
याचे उत्तम उदाहरण म्हणजे क्वांट स्मॉल कॅप फंडचा डायरेक्ट प्लॅन. मागील 7 वर्षांमध्ये, या स्मॉल-कॅप म्युच्युअल फंड योजनेद्वारे, गुंतवणूकदारांनी दरमहा 10,000 रुपयेच्या SIP गुंतवणूक करून तब्बल 17.52 लाख परतावा मिळवला आहे. 7 जानेवारी 2013 रोजी या स्मॉल-कॅप म्युच्युअल फंडाची स्थापना करण्यात आली होती. या म्युचुअल फंडा ने त्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत 229 टक्के इतका मजबूत परतावा मिळवून दिला आहे. तर या कालावधीत एकूण परतावा सुमारे 13.50 टक्के वार्षिक दिला आहे.

जबरदस्त परतावा :
मागील एका वर्षात, या म्युच्युअल फंडाने अजिबात परतावा दिला नाही. तर मागील दोन वर्षात 65.60 टक्के पेक्षा जास्त वार्षिक परतावा कमावला आहे. आणि 175 टक्के पूर्ण परतावा मिळवून दिला आहे. मागील 3 वर्षांत, या स्मॉल-कॅप म्युच्युअल फंडाने सुमारे 35 टक्के वार्षिक परतावा दिला होता तर या कालावधीत सुमारे 146.50 टक्के परतावा दिला आहे.

10 हजारांच्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा :
जर तुम्ही 3 वर्षांपूर्वी या म्युच्युअल फंड प्लॅनमध्ये दर मासिक 10,000 रुपयांची SIP गुंतवणूक सुरू केली असती, तर आज तुम्हाला 6.44 लाख रुपये परतावा मिळाला असता. पण जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी क्वांट स्मॉल कॅप फंड – डायरेक्ट प्लॅन मध्ये मासिक 10,000 रुपयांची मासिक एसआयपी गुंतवणूक सुरू केली असती, तर ती आज तुम्हाला 11.71 लाख रुपये परतावा मिळाला असता. त्याचप्रमाणे, जर तुम्ही 7 वर्षांपूर्वी या स्मॉल-कॅप योजनेत 10,000 रुपयांची मासिक एसआयपी गुंतवणूक सुरू केली असती, तर ती आज तुम्हाला 17.52 लाख रुपये परतावा मिळाला असता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Mutual funds SIP for long term benefits on 27 August 2022.

हॅशटॅग्स

#Investment Tips(143)#Mutual Funds(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x