आम्ही लोकसभेच्या 40 पैकी 40 जागा जिंकणार, त्यामुळेच भाजपचे 3 जावई CBI, ED आणि IT धावून आले - तेजस्वी यादव
Bihar Politics | केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापरावरून बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, जेव्हा भाजपला राज्यात भीती वाटते किंवा तोटा होतो, तेव्हा ते सीबीआय, ईडी आणि आयटी या तीन जावयांना पुढे करतात. मी परदेशात गेल्यावर भाजप माझ्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करते. नीरव मोदीसारखे फसवेगिरी करणारे पळून जातात, तेव्हा ते काहीच करत नाहीत.
भाजपला २०२४ ची भीती :
आम्ही क्रिकेटपटू आहोत आणि ही जोडी (आरजेडी आणि जदयू) कधीही न संपणारी भागीदारी करणार आहे,” असं बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी विधानसभेत सांगितलं. ही सर्वात मोठी इनिंग असणार आहे, ही भागीदारी बिहार आणि देशाच्या विकासासाठी काम करेल. यावेळी एकही धावबाद झाला नाही. भाजपचे सर्वात मोठे दुखणे म्हणजे २०२४ ची भीती.
विधानसभेत बिहारचे उपमुख्यमंत्री म्हणाले की, जर ते भाजपसोबत राहिले तर ते राजा हरिश्चंद्र होतील आणि त्यांनी हात सोडला तर भ्रष्टाचारी. परदेशात गेल्यावर मला लुकआऊट नोटीस येते, पण मेहुल चोक्सी, नीरव मोदी, ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांच्यावर नजर नव्हती. हजारो कोटी घेऊन ते पळून गेले.
25 ठिकाणांवर छापे :
याआधी सीबीआयने लँड फॉर जॉब घोटाळा प्रकरणी बिहारसह दिल्ली आणि हरियाणातील 25 ठिकाणांवर छापे टाकले होते. आज सकाळी सीबीआयही राजदच्या चार बड्या नेत्यांच्या घरी पोहोचली होती. दरम्यान, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या संपत्तीची चौकशी करण्यासाठी त्यांच्याशी संबंधित ठिकाणांवरही सीबीआयचं पथक पोहोचल्याचं वृत्त आहे. मात्र विधानसभेत बोलताना तेजस्वी म्हणाले की, “माझा याच्याशी काहीही संबंध नाही.
त्या मॉलचे उद्घाटन भाजपच्या एका खासदाराच्या हस्ते :
तेजस्वी यादव म्हणाले की, सीबीआय हरियाणातील गुरुग्राममधील एका मॉलवर छापा टाकत आहे. सीबीआय सध्या ज्या मॉलमध्ये छापे टाकत आहे, त्या मॉलचे उद्घाटन भाजपच्या एका खासदाराच्या हस्ते करण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. त्यात माझं नाव का खेचलं जातंय हे कळत नाही, काही लोक कथा रचत आहेत.
माहितीनुसार, सीबीआयची टीम गुरुग्राम सेक्टर-71 मधील अर्बन क्यूब्स मॉलमध्येही पोहोचली आहे. सध्या या मॉलचे बांधकाम सुरू आहे. सकाळी दहाच्या सुमारास हे पथक दाखल झाल्याची माहिती आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचा या मॉलमध्ये हिस्सा असल्याची माहिती आहे. अर्बन क्यूब सेक्टर ७१ मॉल व्हाइट लँड कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे बांधण्यात येत आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Bihar Deputy CM Tejasvi Yadav on Loksabha Election 2024 check details 24 August 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News