21 November 2024 10:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Whatsapp Features | व्हॉट्सॲपमध्ये हे दोन बदल होणार आहेत, युजर्स स्क्रीनशॉटमध्ये पाहू शकतात त्यांचा लूक

Whatsapp Features

Whatsapp Features | व्हॉट्सॲप सध्या अनेक फिचर्सची चाचणी घेत असून, आता आणखी दोन बदल या ॲपमध्ये पाहायला मिळणार आहेत. WABetaInfo ने ट्विटरवर एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यामध्ये असे दिसून येते की यात काही नवीन डिझाइन आले आहे. खरं तर, ग्रुप इन्फोमध्ये ग्रुप अॅडमिन इंडिकेटर्सच्या रंगात बदल झाला आहे.

WABetaInfo’ने शेअर केला स्क्रीनशॉट :
WABetaInfo ने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये, आधी आणि आताच्या डिझाइनमध्ये किती फरक आहे हे स्पष्टपणे दिसून येते. बीटाच्या लेटेस्ट अपडेटमध्ये युजर्सना हा बदल मिळणार असून, आता डार्क हायलाइटमध्ये ‘ग्रुप अॅडमिन’ इंडिकेटर दिसणार आहे.

WB-2

WABetaInfo’ने माहिती दिली आहे की, ॲपमध्ये भाषेशी संबंधित नवीन फीचरची चाचणी घेतली जात आहे. WABetaInfo ने आपल्या ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे, त्यानुसार या नव्या फीचरचे नाव ‘ॲप लँग्वेज’ असे असून, ते व्हॉट्सॲपच्या अँड्रॉइड बीटा 2.22.19.10 साठी प्रसिद्ध होत आहे.

WABetaInfo’ने आपल्या ट्विटमध्ये दिलेल्या ब्लॉगमध्ये एक स्क्रीनशॉटही शेअर केला आहे, ज्यामध्ये असे दिसून येते की, बीटा टेस्टर्स आता व्हॉट्सॲप सेटिंगमध्ये ॲपची भाषा बदलू शकतील.

WABETAINF

डब्ल्यूबीने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार, बीटा टेस्टरला व्हॉट्सॲप सेटिंग आणि वेलकम स्क्रीनवर व्हॉट्सअॅपमधील भाषा बदलण्याचा पर्यायही मिळणार आहे. ॲप रिइन्स्टॉल करताना युझर्सला वेलकम स्क्रीनवरही हा भाषेचा पर्याय मिळेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Whatsapp Features in beta testing 2 changes design coming to Whatsapp soon check details 29 August 2022.

हॅशटॅग्स

#Whatsapp Features(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x