22 November 2024 1:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

Bigg Boss 16 | प्रतीक्षा संपणार! लवकरच भाईजान सलमान खानचा 'बिग बॉस 16' घराघरात दिसणार

Bigg Boss 16

Bigg Boss 16 | बॉलिवूड मधील रिअॅलिटी शो म्हटलं की लोकप्रिय बिग बॉसचे नाव आधी समोर येते. आत्ता पर्यत बिग बॉसचे 15 सीझन झाले आहेत. एक सीझन संपल्यानंतर दिसऱ्या सीझनची चाहते वाट पाहत असतात. बिग बॉस तीन महिने चाहत्यांचे भरभरून मनोरंजन करत असतो. आत्तापर्यंत सलमान खानने 13 सीझन होस्ट केले आहेत आणि पुढील येणारा बिह बॉस सीझन 16 देखील भाईजान होस्ट करणार असल्याचे सांगितले जात आहे. तर येणाऱ्या 16 व्या सीझनसाठी निर्मात्यांनी सेलिब्रिटींशी संपर्क देखील साधला आहे. तर यासाठी काही नावे देखील समोर आली आहेत. यासोबतच सलमान खानने प्रोमो शूट देखील केल्याचे सांगितले जात आहे. चाहत्यांना आता शो सुरू होण्याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान, शो सुरु होण्याची तारीख देखील ठरवल्याचे समोर आले आहे.

16 व्या सीझनची तारीख आली समोर :
14 आणि 15 सीझन टीआरपीच्या बाबतीमध्ये मागे राहिले आहेत मात्र हा येणारा 16 वा सीझन याची कसर भरून काढेल याची खात्री निर्मात्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, मेकर्सकडून 16 व्या सीझनसाठी स्पर्धकांची यादी लवकरच जाहीर केली जाणार आहे. माध्यमांनुसार, येत्या 8 ऑक्टोबरपासून बिग बॉस सीझन 16 ला सुरुवात होऊ शकते.

चाहत्यांमध्ये 16 व्या सीझनसाठी भरभरून उत्साह  :
शोच्या तारखेबाबत अद्याप कोणतीही खुलासा करण्यात आलेला नाही, मात्र माध्यमांनुसार बिग बॉस 16 सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लॉन्च होऊ शकतो. तसेच बिग बॉसच्या पुढील सीझनबद्दल चाहत्यांमध्ये खूप उत्साह दिसून येत आहे. दरम्यान, चाहते शो सुरू होण्याची वाट पाहत आहेत.

शोच्या होस्टींगसाठी भाईजानने आकारले कोटींचे पॅकेज :
माध्यमांनुसार, भाईजानने बिग बॉसच्या 16 व्या सीझनच्या एका एपिसोडच्या होस्टींगसाठी तब्बल 43 कोटी रुपये आकारले आहेत. दरवर्षी या शोसाठी होस्टींगची फी वाढते, तर सुरवातीला शो होस्ट करण्यासाठी सलमान 2.5 कोटी आकारत होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Bigg Boss will start soon Checks details 2 September 2022;

हॅशटॅग्स

#Bigg Boss 16(7)#Salman Khan(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x