29 April 2025 2:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | पीएसयू शेअर अत्यंत स्वस्त, खरेदी करून ठेवा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Reliance Power Share Price | 41 रुपयांचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी दिले महत्वाचे संकेत - NSE: RPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स मालामाल करणार, नोमुरा ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: RELIANCE Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन स्टॉक मालामाल करणार; टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: SUZLON Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, BUY रेटिंग - NSE: TATAPOWER
x

WhatsApp Updates | 24 ऑक्टोबरपासून आयफोन, अँड्रॉईड फोनवर व्हॉट्सॲप सेवा बंद होणार, काय आहे संपूर्ण प्रकरण

WhatsApp Updates

WhatsApp Updates | आज इंटरनेटच्या युगात प्रत्येक व्यक्ती आपलं बहुतांश काम मोबाइलच्या माध्यमातून पूर्ण करत असतो. मग ते कुणाला काही सांगायचे किंवा कुणाला एखादा मेसेज द्यायचा. आपण कॉल किंवा संदेश देता आणि आपले म्हणणे दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवता. अशा परिस्थितीत सोशल मीडिया ॲप्समुळे हे काम सोपं झालं आहे. सोशल मीडिया ॲप्सच्या माध्यमातून लोक व्हॉइस कॉलच्या माध्यमातून एकमेकांशी तर बोलू शकतातच, शिवाय दूर बसून व्हिडिओ कॉलद्वारे एकमेकांना पाहू आणि ऐकूही शकतात.

जगभरात करोडो युजर्स :
असेच एक सोशल मीडिया ॲप्स म्हणजे व्हॉट्सॲप. जगभरात या ॲप्सचे लाखो युजर्स आहेत, जे व्हॉट्सॲपचा वापर करतात. आपल्या युजर्सना अधिक चांगली सेवा देण्यासाठी व्हॉट्सॲप अनेक वेळा आणि वेळोवेळी ॲप्स अपडेट करतं, जेणेकरून युजर्सना चांगल्या सेवा मिळू शकतील.

मोबाईलमध्ये व्हॉट्सॲप वापरता येणार नाही :
अशा परिस्थितीत पुढील महिन्यापासून तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सॲप वापरता येणार नाही असं सांगितलं तर तुम्ही काय कराल? आपण अस्वस्थ व्हाल आणि यासाठी इंटरनेटवर संशोधन सुरू कराल.

असाच काहीसा प्रकार आयफोन आणि अँड्रॉईड युजर्ससोबत होणार आहे. अॅपलने नुकत्याच जारी केलेल्या निवेदनानुसार, इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सॲप कंपनीच्या आयओएस 10 आणि आयओएस 11 डिव्हाइसला सपोर्ट करणे बंद करेल, म्हणजेच ॲ अँपलच्या आयओएस 10 आणि आयओएस 11 च्या वापरकर्त्यांना व्हॉट्सॲप वापरता येणार नाही.

व्हॉट्सॲप आधीपासूनच अलर्ट :
व्हॉट्सॲप आधीपासूनच आयफोन आणि अँड्रॉईड युजर्सना याबाबत अलर्ट करत आहे. अलर्टमध्ये व्हॉट्सॲप सांगत आहे की, 24 ऑक्टोबरपासून ज्या आयफोन युजर्सकडे आयओएस 12 किंवा नंतरचे डिव्हाईस आहेत, त्यांनाच त्यांच्या सेवा वापरता येणार आहेत. त्याचबरोबर स्मार्टफोन युजर्ससाठी जारी करण्यात आलेल्या अलर्टमध्ये अँड्रॉईड 4.1 किंवा आधीचे व्हेरिएंटचे डिव्हाईस असलेल्या युजर्सना व्हॉट्सॲप वापरता येणार नाही, असं म्हटलं जात आहे. अशा परिस्थितीत तुम्हीही आयफोनच्या आयओएस 10 आणि आयओएस 11 चे युजर असाल तर तुमचे डिव्हाईस तात्काळ अपडेट करा.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: WhatsApp Updates To Stop Working On These Iphones From October 24 Check Details 02 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#WhatsApp Updates(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या