Thiruchitrambalam Box Office | धनुषचा 'थिरुचित्रंबलम' चित्रपट परदेशात रचतोय इतिहास, कमाईचे आकडे पाहून व्हाल थक्क
Thiruchitrambalam Box Office | तमिळ भाषेतील रोमँटिक कॉमेडी ‘थिरुचित्रंबलम’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. दरम्यान, मिथुन जवाहर दिग्दर्शित या चित्रपटाने तामिळनाडूमध्ये 100 कोटींच्यावर कमाई केली तर, मुख्य भूमिकेमध्ये दिसून येत असलेल्या तमिळ सुपरस्टार धनुषच्या या चित्रपटानने ‘विक्रम’ आणि ‘बीस्ट’ला मागे टाकले आहे. तसेच यूएस बॉक्स ऑफिसवर 2022 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा तिसरा तमिळ चित्रपट बनला आहे.
धनुषचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला ‘थिरुचित्रम्बलम’ :
‘रांझणा’ या हिंदी चित्रपटापासूनच धनुषने त्याची छाप प्रेक्षकांवर पडायला सुरुवात केली, आणि आता धनुष फक्त दाक्षिणात्य चित्रपटापुरता मर्यादित राहिलेला नसून तो आता हॉलिवूडमध्येसुद्धा महत्वाच्या भूमिका करताना दिसून येत आहे. धनुषच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीतील हा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट आहे. धनुषच्या चित्रपटाने ₹100 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे.
चाहत्यांकडून ब्लॉकबस्टर धनुषचे कौतुक :
धनुषचा ‘थिरुचित्रंबलम’ चित्रपट तामिळनाडूमधील अभिनेत्याच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून उदयास आला आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. तमिळनाडू मध्ये नाही तर सर्वत्र धनुषचे चित्रपट चाहते आवर्जून पाहतात आणि त्या चित्रपटांना भरभरून प्रतिसाद देतात हे या ‘थिरुचिताम्बलम’ चित्रपटावरून समजलेच आहे. ब्लॉकबस्टर चित्रपटामध्ये नित्या मेनन, राशी खन्ना, प्रकाश राज, भारतीराजा आणि प्रिया भवानी शंकर यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
चित्रपटाची कमाई सुरुच :
चित्रपट रिलीज होऊन तीन आठवडे झाले आहेत तरी धनुषचा ‘थिरुचिताम्बलम’ चित्रपट जबरदस्त कमाई करत आहे. दरम्यान, धनुषच्या ‘थिरुचिताम्बलम’ चित्रपटाने कर्णन यांचे लाइफटाईम कलेक्शन देखील मागे टाकले आहे.
धनुषच्या हातामध्ये लागोपाठ चित्रपट,
तमिळनाडूला ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर धनुष हॉलिवूडमधील चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारताना दिसून येणार आहे. दरम्यान, नेटफ्लिक्स चित्रपट ‘द ग्रेमन’ नंतर धनुष दिसून आला आहे. धनुष आगामी तामिळ-तेलुगू ‘वाथी’ चित्रपटामध्ये झळकणार आहे. चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात झाली असून, या चित्रपटाची तेलगू आवृत्तीचे नाव ‘सर’ असे असणार आहे. ‘वाथी’ या चित्रपटामध्ये धनुष प्रोफेसरच्या भुमिकेमध्ये दिसून येणार आहे तर हा चित्रपट तेलुगू इंडस्ट्रीतील डेब्यू चित्रपट असणार आहे. धनुष आणि त्याचे चाहते त्याच्या आगामी नाने वरुवेनच्या रिलीजचीही वाट पाहत आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Tiruchitambalam Box Office Earnings Checks details 2 September 2022
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार