15 April 2025 12:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर आयआरएफसी शेअर्सची जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस तज्ज्ञांकडून जाहीर - NSE: IRFC RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर तेजीमुळे फोकसमध्ये, 52 टक्के परतावा मिळेल, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: AWL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सची जोरदार उसळी, मजबूत खरेदी सुरु, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: TATAMOTORS IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA IRB Share Price | 45 रुपयांचा इन्फ्रा कंपनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IRB Suzlon Share Price | गुंतवणूकदार तुटून पडले, रॉकेट तेजीने कमाई होणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: SUZLON
x

Baahubali 2 Scenes | बाहुबलीमध्ये हॉलिवूड चित्रपटातील सीन, दृश्य 'अ‍ॅव्हेंजर्स' आणि 'हरक्यूलिस' चित्रपटामधील, व्हिडीओ व्हायरल

Bahubali

Baahubali 2 Scenes |  साऊथचे चित्रपट म्हटलं की चाहत्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद असतो, चित्रपटामधील सुपरस्टार कलाकार, चित्रपटाची कथा, अभिनय सर्व गोष्टींचा चाहते अगदी मनमुराद आनंद घेतात. त्यातली त्यात जर तो चित्रपट राज मौली यांचा असेल तर त्या चित्रपटाला तुफान गर्दी असते. साऊथचे डिरेक्टर एसएस राजामौली यांचा सर्वात गाजलेला चित्रपट म्हणजे ‘बाहुबली’ या चित्रपटाला चाहत्यांची पसंती असते. दरम्यान, बाहुबली चित्रपटानंतर साऊथच्या चित्रपटांना मागणी यायला लागली. चित्रपटांची क्रेझ वाढल्याने अखिल भारतीय चित्रपटांच्या संख्येमध्ये सुद्धा वाढ झाली. एसएस राजामौली यांच्या चित्रपटाची क्रेझ बघता बाहुबली 2 आला, तो चित्रपट सुद्धा ब्लॉकबस्टर ठरला आणि त्या चित्रपटाच्या कमाईने एक नवा विक्रम रचला.

दरम्यान, या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये जगातील कोणत्याही प्रकारचे ज्ञान तुम्ही घर बसल्या घेऊ शकता, लाखो करोडो लोकांपर्यंत क्षणात माहिती पोहोचले. चांगली असो वा वाईट व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. असं काहीस चित्रपटाबाबत घडलं आहे. नुकताच ट्विटरवर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे तर यामध्ये बाहुबली चित्रपटामधील एकूण 36 सीन दिसून येत आहेत. असेही म्हटले जात आहे की, चित्रपटामधील हे सीन हॉलिवूडच्या चित्रपटामधून कॉपी करण्यात आले आहेत.

लिंक मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे :
बाहुबली चित्रपटामधील 36 सीनचा एक व्हिडीओ ट्विटरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. @GemsofSouthWood नावाच्या युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. चित्रपटामधील प्रभास आणि तमन्नाच्या भेटण्याचा सीन तर तुम्हाला आठवतच असेल, तोच सीन अवतार चित्रपटामध्ये असल्याचे दिसून आले आहे. जेव्हा प्रबास धनुष्यबाण चालवतो, तो दृश्य ‘अ‍ॅव्हेंजर्स’ आणि ‘हरक्यूलिस’ चित्रपटामधील असल्याचे सांगितले जात आहे. तर धबधब्या जवळील सीन हॉलिवूड ‘किंग काँग’ चित्रपटामधील असल्याचे म्हटले जात आहे.

व्हायरल व्हिडीओमुळे चाहत्यांचा कमेंट :
दरम्यान, ट्विटरवर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर वापरकर्तांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहीले की, ज्यांना साऊथचे चित्रपट आवडतात ते कुठे गेले आहेत ? दुसरा म्हणाला, चित्रपट पाहिला पण कधी समजलेच नाही. तर काही जण बाहुबली चित्रपटाचे समर्थन करत म्हणाले की, बाहुबली चित्रपटानंतर हॉलिवूडचे काही चित्रपट रिलीज झाले आहेत. आता हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे की हे सर्व सत्य आहे की या अफवा आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Some scenes from Hollywood films were seen in Baahubali Checks details 3 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Bahubali(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या