25 November 2024 1:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Vs Post Office | SIP की पोस्ट ऑफिस RD, कोणती गुंतवणूक तुम्हाला बनवेल लखपती, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News Business Idea | कमाईचे साधन शोधत आहात; मग या 3 बिझनेस टिप्स खास तुमच्यासाठी, जोमाने होईल 12 महिने कमाई - Marathi News NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी 'आउटपरफॉर्म' रेटिंग, रॉकेट होणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदी वाढली - NSE: RVNL
x

VIDEO: ‘अपनी बात राहुल के साथ’, राहुल गांधींचा जनतेशी थेट संवाद!

नवी दिल्ली : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी निरनिराळ्या रणनीतीचा अवलंब करताना दिसत आहेत. आता त्यांनी थेट जनतेशी संवाद साधण्यासाठी आणि मोदींच्या ‘चाय पे चर्चा आणि मन की बात’ला टक्कर देण्यासाठी ‘अपनी बात राहुल के साथ’ हा संवाद उपक्रम राबविणार आहेत.

काही दिवसांपूर्वी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत भोजनाचा आस्वाद घेतला होता. सदर विषयाला अनुसरून त्यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे आणि त्यांनी विद्यार्थ्यांकडून खूप काही शिकायला मिळाल्याचे म्हटले आहे. त्या ट्विट’मध्ये राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, ‘मी काही दिवसांपूर्वी देशभरातून आलेल्या काही विद्यार्थ्यांची भोजनाप्रसंगी भेट घेतली. ती भेट अत्यंत महत्वपूर्ण ठरली. आमच्यात विचारांची देवाण-घेवाण झाली. यातून मी खूप काही शिकलो’.

दरम्यान, या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांबरोबर मोदी सरकार, शिक्षण व्यवस्था तसेच काही इतर महत्वाच्या मुद्यांवर सविस्तर आणि समोरासमोर चर्चा करताना दिसतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाला टक्कर देण्यासाठी काँग्रेसने ‘अपनी बात राहुल के साथ’ हा उपक्रम सुरू केल्याचे सांगण्यात येते.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x