27 April 2025 10:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
e Filing Income Tax | पगारदारांनो, नवीन टॅक्स प्रणालीमध्ये 75000 रुपयांची स्टॅंडर्ड डिडक्शन मिळणार नाही? मोठी अपडेट LIC Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या सरकारी फंडात, अनेक पटीने पैसा परतावा मिळतोय, सेव्ह करून ठेवा EPFO Passbook | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, EPF प्रक्रियेत मोठे बदल, हक्काच्या पैशाबाबत अपडेट Horoscope Today | 28 एप्रिल 2025, तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा असेल? तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 28 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mishtann Foods Share Price | पेनी स्टॉक 52-आठवड्यांच्या जवळ पोहोचला, तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले - BOM: 539594 GTL Share Price | पेनी स्टॉकने लोअर सर्किट हिट केला, हा स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA
x

Drishyam 3 Movie | साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांचा 'दृश्यम'चा सिक्वेल चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला, 'दृश्यम' 3 इतिहास रचू शकतो

Drishyam 3

Drishyam 3 Movie | बॉलिवूड आणि दक्षिण या चित्रपटांमध्ये शब्दयुद्ध पहायला मिळते. चित्रपटाच्या वेगळेपणामुळे चाहत्यांमधील वेगवेगळ्या भाषांमध्ये चित्रपट बघण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. मल्याळम सिनेमाचे सुपरस्टार मोहनलाल यांचा ‘दृश्यम’ चा सिक्वेल चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजच्या पहिल्या दोन सिनेमांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं. याच नावाचा त्याचा हिंदी रिमेकही खूप यशस्वी ठरला यावरून त्याच्या यशाचा अंदाज बांधता येतो.

पहिल्या दोन सिक्वेलला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम
मल्याळम सिनेमाचे सुपरस्टार मोहनलाल यांचा ‘दृश्यम’ चित्रपट चांगलाच गाजला आहे. दरम्यान, या चित्रपटाचा पुढील सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दोन सिक्वेल प्रमाणे ‘दृश्यम’ 3 सुद्धा इतिहास रचू शकतो असा विश्वास निर्मात्याकडून दर्शवला जात आहे.

निर्मात्याने दृश्यम 3 सिक्वेलची केली पुष्टी
दृश्यमचे पहिले दोन सिक्वेल पाहता चित्रपटाला चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. दक्षिण भारतीय निर्माते अँटोनी पेरुम्बावूर यांनी एका पुरस्कार सोहळ्या दरम्यान ‘दृश्यम 3’ सिक्वेलची अधिकृत घोषणा केली आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाला चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

2021 मध्ये येणार दृश्यमचा सिक्वेल
आत्तापर्यंतच्या ‘दृश्यम’ चित्रपटाला मिळालेल्या उत्तुंग यशानंतर, सुपरस्टार मोहनलाल यांचा ‘दृश्यम 3’ सिक्वेल येणार आहे. दरम्यान, या चित्रपटाचे यश पाहता 2015 मध्ये याचा हिंदी रिमेक सुद्धा आला होता. ज्यामध्ये अजय देवगण, तब्बू आणि श्रिया सरन मुख्य भूमिकेमध्ये दिसून आले होते.

साऊथच्या ‘दृश्यम’ या सुपरहिट चित्रपटाचं यश पाहता त्याचा हिंदी रिमेक 2015 मध्ये बॉलिवूडमध्ये बनवण्यात आला होता, ज्यात अजय देवगन (अजय देवगण), तब्बू आणि श्रिया सरन मुख्य भूमिकेत होते. हिंदी व्यतिरिक्त कन्नड, तामिळ आणि तेलगू भाषेतही हा चित्रपट बनवण्यात आला होता. सध्या ‘दृश्यम २’ चा अधिकृत रिमेक सुरू असून हा चित्रपट १८ नोव्हेंबर २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Drishyam 3 Movie Official confirmation Checks details 3 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Drishyam 3(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या