22 November 2024 1:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

ईडीकडून रॉबर्ट वाड्रा यांची आज पुन्हा चौकशी झाली

नवी दिल्ली : प्रियांका गांधी सक्रिय राजकारणात उतरताच त्याचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या पाठीमागे ईडी’चा ससेमिरा लागल्याचे विरोधक आरोप करत आहेत. दरम्यान आज मनी लाँड्रिंगप्रकरणाच्या चौकशीसाठी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांदी यांचे पती रॉबर्ट वाड्रा ईडीच्या कार्यालयात हजर झाले. ईडीकडून त्यांची तब्बल ५ तास सखोल चौकशी झाल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान, वाड्रा यांनी ईडीच्या सर्व प्रश्‍नांवर दिलेली उत्तर समाधानकारक नसल्याचे ईडीने यावेळी सांगितले. दरम्यान, लंडनच्या ब्रायनस्टन स्क्वेयर परिसरातील १७.६१ कोटी रुपयांची जमीन वाड्रा यांनी पैशांची अफरातफर करुन खरेदी केलाचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. परंतु रॉबर्ट वाड्रा यांनी आपली लंडनमध्ये कोणती सुद्धा संपत्ती नसल्याचा दावा केला, अशी माहिती मिळत आहे. वाड्रा यांना सदर प्रकरणी दिल्ली कोर्टाने १६ फेब्रुवारीपर्यंत अंतरिम जामीन दिला आहे आणि चौकशी दरम्यान संपूर्ण सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x