22 November 2024 2:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

Multibagger Stocks | या सरकारी कंपनीच्या शेअरने छप्परफाड परतावा दिला, 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 12 लाखांपेक्षा जास्त रिटर्न

Multibagger Stock, GAIL

Multibagger Stocks | मागील 15 वर्षांत ही पाचवी वेळ आहे, जेव्हा या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स जाहीर केले आहे. या महारत्न कंपनीत दीर्घ काळापासून गुंतवणूक करणाऱ्या भागधारकांना आता बोनस शेअर्सच्या रूपाने जबरदस्त फायदा होणार आहे.

देशातील सर्वात मोठी नैसर्गिक वायू कंपनी गेल इंडिया आपल्या भागधारकांना बोनस शेअर्स देणार असल्याचे जाहीर केले आहे. कंपनी 1:2 च्या प्रमाणात बोनस वितरीत करेल. म्हणजेच प्रत्येक 2 शेअर्सवर 1 बोनस शेअर दिला जाईल. बोनस शेअरची रेकॉर्ड तारीख 7 सप्टेंबर 2022 निश्चित करण्यात आली आहे. मागील 15 वर्षांत ही पाचवी वेळ आहे जेव्हा कंपनी आपल्या भागधारकांना बोनस शेअर्स वितरीत करत आहे. या महारत्न कंपनीच्या शेअर्स मध्ये दीर्घ काळापासून आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवलेल्या भागधारकांना बोनस शेअर्सच्या माध्यमातून जबरदस्त फायदा झाला असून त्याचा थेट परिणाम त्यांच्या परताव्यावर झाला आहे.

1 लाखावर मिळाला 12 लाख परतावा :
7 सप्टेंबर 2007 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर GAIL India Limited कंपनीचे शेअर्स 58.28 च्या किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 7 सप्टेंबर 2007 रोजी या महारत्न कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर तुम्हाला 1716 शेअर्स मिळाले असते. GAIL India ने ऑक्टोबर 2008 ते जुलै 2019 पर्यंत 4 वेळा बोनस शेअर्स वितरीत केले आहे. जर तुम्ही या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून होल्ड केली असती, तर बोनस शेअर्स मिळाल्यानंतर एकूण तुमच्या शेअर्सची संख्या तब्बल 9152 झाली असती. GAIL India चे शेअर्स 2 सप्टेंबर 2022 रोजी BSE निर्देशांकावर वर 135.40 रुपये किमतीवर बंद झाले होते. 2 सप्टेंबर 2022 च्या बाजारभावानुसार, 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य सध्या 12.40 लाख रुपये झाले आहे.

पाचव्यांदा बोनस जाहीर :
GAIL इंडिया कंपनीने मागील 15 वर्षांत पाचव्यांदा बोनस शेअर्स जाहीर केले आहे. पाचव्या बोनस इश्यूमध्ये मिळालेले शेअर्स सुरुवातीपासून केलेल्या गुंतवणुकीत जोडले तर 1 लाख रुपये गुंतवणाऱ्या व्यक्तीकडे सध्या 13,728 शेअर्स झाले असतील. 12 जानेवारी 2001 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर गेल इंडियाचे शेअर्स 9.77 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2 सप्टेंबर 2022 रोजी कंपनीचे शेअर्स बीएसईवर 135.40 रुपये किमतीवर बंद झाले होते. जर तुम्ही 12 जानेवारी 2001 रोजी गेल इंडियाच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तर सध्या तुमचे गुंतवणूक मूल्य 13.85 लाख रुपये झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stock GAIL India limited company has declared bonus on 6 September 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)GAIL(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x