22 November 2024 6:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News
x

Hot Stocks | या कंपनीच्या शेअर्सनी एकदिवसात 12 टक्के उसळी घेतली, गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण

Hot Stocks

Hot Stocks| केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने नुकताच भारतीय रेल्वेच्या जमीन भाडेपट्ट्याच्या नियमात एक जबरदस्त बदल केला आहे. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने काही विशिष्ट परिस्थितीत रेल्वे परवाना शुल्क 6 टक्क्यांवरून कमी करून आता 1.5 टक्के केला आहे.

केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारने भारतीय रेल्वेच्या जमीन भाडेपट्ट्याच्या नियमात काही बदल केले आहेत. मोदी मंत्रिमंडळाने काही विशिष्ट परिस्थितीत रेल्वे परवाना शुल्क 6 टक्क्यांवरून 1.5 टक्के कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारने भाडेपट्टीचा कालावधी जो पूर्वी 5 वर्ष होता, त्यात बदल करून आता 35 वर्षांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नीती आयोगाच्या वतीने कंटेनरसाठी रेल्वे जमीन शुल्क 3 टक्क्यांपेक्षा कमी करण्याची सूचना करण्यात आली होती. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर कॉन्कोरच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे.

CONCOR शेअर्समध्ये 12 टक्क्यांनी वाढ :
मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील या निर्णयाची घोषणा होताच शेअर बाजारात कॉनकॉरच्या शेअर्सनी जबरदस्त उसळी घेतली. या बातमीनंतर CONCOR चे शेअर्स 747.65 रुपयांच्या पातळीवर जाऊन पोहोचले होते. कंपनीचे शेअर्स दिवसा अखेर 669.20 रुपयांच्या पातळीवर जाऊन बंद झाले होते. मागील 6 महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 27.02 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याच वेळी, या एका वर्षात कंपनीच्या शेअरच्या किमतीत 16.70 टक्क्यांची वाढ झाल्यामुळे गुंतवणूकदारांनी जबरदस्त कमाई केली होती.

केंद्र सरकारचा हा नवीन निर्णय भारतीय कंटेनर कॉर्पोरेशन (कॉनकॉर) च्या निर्गुंतवणुकीशीही जोडून पहिला जात आहे. CONCOR कंपनी भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत येते. कंपनी कंटेनरची वाहतूक आणि हाताळणी व्यवसायात गुंतलेली आहे. कंपनीचे संपूर्ण भारतात एकूण 61 कंटेनर डेपो आहेत. ज्यामध्ये 26 कंटेनर डेपो रेल्वेच्या जमीनवर भाडेतत्त्वावर आहे.

नोव्हेंबर 2019 मध्ये, केंद्रीय मंत्रिमंडळाने 54.80 टक्के शेअर्स पैकी 30.80 टक्के समभाग विकण्यास मंजुरी दिली होती. या विक्रीनंतर केंद्र सरकार 24 टक्के मालकी आपल्याकडे ठेवणार आहे. सरकारने या आर्थिक वर्षासाठी निर्गुंतवणुकीद्वारे 65,000 कोटी रुपये जमावण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. ज्यामध्ये CONCOR निर्गुंतवणुकीद्वारे 8000 कोटी रुपये जमा करायचे आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Hot Stock CONCOR Disinvestment announced by Government of India on 8 September 2022.

हॅशटॅग्स

#Hot Stocks(297)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x