23 November 2024 8:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Inflation Money Valuation | महागाईचा तुमच्या गुंतवणूक बचतीला फटका, महागाईने तुमच्या गुंतवणुकीतील पैशाचे खरे मूल्य किती उरणार पहा

Inflation Money Valuation

Inflation Money Valuation | मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशात महागाईने रौद्ररूप घेतलं आहे ते दिवसेंदिवस अधिक गडद होतं असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे विषय केवळ जनतेच्या महिन्याच्या खर्चाशी संबंधित राहिला नसून, महागाईचा थेट परिणाम सामान्य जनतेच्या बचतीवरील पैशावर म्हणजे गुंतवणुकीवर देखील होतं असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे प्रचंड महागाईमुळे जनतेचा आर्थिक वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ अत्यंत बिकट होतो आहे असं अर्थतज्ज्ञ आकडेवारीतून सांगत आहेत.

भविष्यातील ध्येय ठरवताना महागाई लक्षात ठेवा :
जर तुमचे उत्पन्न सुरू झाले असेल किंवा तुम्ही नोकरीत आला असाल तर लवकरात लवकर गुंतवणूक आणि बचत करण्याची सवय लावून घ्या. पण भविष्यातील ध्येय ठरवताना महागाई लक्षात ठेवा. आजच्या दिवसाबद्दल बोलायचे झाले तर महागाई वार्षिक सुमारे 7 टक्के दराने वाढत आहे. म्हणजेच दरवर्षी आपल्या गरजांवर ७ टक्के अधिक खर्च करावा लागतो. महागाई अशीच वाढत राहिली तर आजच्या १०० रुपयांचे मूल्य ३५ ते ४० रुपयांपर्यंत खाली येईल. याचा अर्थ भविष्यासाठी निधी तयार करण्याचा विचार करत असाल तर त्याची तुलना आजच्याशी करू नका. म्हणजेच 25 वर्षांनंतर दीड कोटीची गरज असेल तर साडेचार कोटींचं तांब्याचं टार्गेट ठेवावं लागेल.

महागाईचा गुंतवणूक बचतीला फटका
बीपीएन फिनकॅपचे संचालक ए.के.निगम म्हणतात की, ज्या पद्धतीने महागाई वाढत आहे, त्यामुळे 20 किंवा 25 वर्षांनंतर खर्च दुप्पट किंवा तिप्पट वाढू शकतो. आज जर तुमच्या सर्व कामासाठी 1 लाख रुपये खर्च येत असतील तर 25 वर्षांनंतर त्यासाठी अडीच ते तीन लाख रुपये खर्च करावे लागतील. जर महागाई दर वर्षी ७ टक्के दराने वाढत असेल तर २५ वर्षांनंतर तुमच्या पैशाचे मूल्य ६० ते ६५ टक्क्यांनी कमी होईल. जर तुम्ही परताव्याची मोजणी करताना चलनवाढ समायोजित केली, तर मूल्यात तीव्र घसरण दिसून येईल. त्यामुळे २५ वर्षांनंतर उद्दिष्ट ठरवताना महागाई लक्षात ठेवा.

25 वर्षांचं कॅल्क्युलेशन : महागाई एडजस्ट न करता :
* महिना निवेश: 8,000 रुपये
* गुंतवणुकीचा कालावधी : २५ वर्षे
* परताव्याचा अंदाज : १२ टक्के
* २५ वर्षांनंतरचे मूल्य : दीड कोटी

25 वर्षांचं कॅल्क्युलेशन : महागाई एडजस्ट केल्यानंतर :
* महिना निवेश: 8,000 रुपये
* गुंतवणुकीचा कालावधी : २५ वर्षे
* परताव्याचा अंदाज : १२ टक्के
* महागाई : वार्षिक ७ टक्के
* महागाई एडजस्ट केल्यानंतरचे मूल्य : ५५ लाख रुपये

(टीपः अशा प्रकारे आपण २५ वर्षांत उभारलेल्या दीड कोटीच्या निधीचे प्रत्यक्ष मूल्य महागाईने एडजस्ट केल्यानंतर ५५ लाख होईल, हे आपण वरती पाहू शकतो.)

20 वर्षांचं कॅल्क्युलेशन : महागाई एडजस्ट न करता :
* महिना निवेश: 8,000 रुपये
* गुंतवणुकीचा कालावधी : २ वर्षे
* परताव्याचा अंदाज : १२ टक्के
* २० वर्षांनंतरचे मूल्य : ८० लाख

महागाई एडजस्ट केल्यानंतर :
* महिना निवेश: 8,000 रुपये
* गुंतवणुकीचा कालावधी : २० वर्षे
* परताव्याचा अंदाज : १२ टक्के
* महागाई : वार्षिक ७ टक्के
* महागाई एडजस्ट केल्यानंतरचे मूल्य : ३७ लाख रुपये

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Inflation Money Valuation of investment check details 10 September 2022.

हॅशटॅग्स

#Inflation Money Valuation(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x