Penny Stocks | या 6 रुपयाच्या शेअरने 1 लाख रुपयाच्या गुंतवणुकीवर तब्बल 6 कोटी रुपये परतावा दिला, आता फ्री बोनस शेअर्स मिळणार
Penny Stocks | ज्योती रेझिन्स अँड अॅडेसिव्ह लिमिटेडच्या शेअरने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा मिळवून दिला आहे. आणि आता कंपनीने आपल्या भागधारकांना बोनस शेअर्स वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीने आपल्या भागधारकांना तब्बल 2:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करण्याची घोषणा केली आहे. 2:1 प्रमाण म्हणजे ज्या भागधारकाकडे कंपनीचा 1 शेअर असेल, त्यांना कंपनी 2 बोनस शेअर्स देईल. कंपनीच्या बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख 9 सप्टेंबर 2022 जाहीर करण्यात आली आहे. कंपनीचे शेअर्स 8 सप्टेंबर रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये 5 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते.
गुंतवणुकीवर 6 कोटी रुपये परतावा :
1 लाख रुपये गुंतवणुकीवर 6 कोटी रुपये परतावा मिळवण्यासाठी भागधारकांना तब्बल 10 वर्षाचा कालावधी लागला. मागील 10 वर्षांच्या कालावधीत ज्योती रेझिन्स आणि अॅडेसिव्ह कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. 11 डिसेंबर 2013 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर रासायनिक उत्पादनांचा उद्योग करणाऱ्या या कंपनीचे शेअर्स फक्त 6.38 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 6 सप्टेंबर 2022 रोजी, कंपनीच्या एका शेअरची किंमत आता BSE वर 4383 रुपयांच्या पातळीवर जाऊन पोचोचले आहे. जर तुम्ही 11 डिसेंबर 2013 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवणूक केली असती, तर आज त्याच्या गुंतवणुकीचे एकूण मूल्य 6.89 कोटी रुपये झाले असते.
मागील 5 वर्षात जबरदस्त परतावा :
ज्योती रेझिन्स आणि अॅडेसिव्ह्सच्या स्टॉकने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. 11 सप्टेंबर 2017 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर कंपनीच्या एका शेअरची किंमत फक्त 82.35 रुपये होती. 6 सप्टेंबर 2022 रोजी कंपनीच्या एका शेअरचे मूल्य BSE वर तब्बल 4383 रुपयांच्या किमतीवर पोहोचले आहे.
1 लाख रुपयेचे केले 53 लाख :
जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये फक्त 1 लाख रुपये लावले असते आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 53.22 लाख रुपये झाले असते. ज्योती रेझिन्स अँड अॅडेसिव्हज कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत तब्बल 4400 रुपये प्रति शेअर आहे. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी किंमत 750.05 रुपये आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Penny Stocks Jyoti Resins and Adhesives share price return on 10 September 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News