16 April 2025 10:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER Trident Share Price | संयम ठेवल्यास हा पेनी स्टॉक श्रीमंत करू शकतो, यापूर्वी दिला 5322 टक्के परतावा - NSE: TRIDENT SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA
x

Investment Tips | उत्तम गुंतवणूक योजना, फक्त एकदाच पैसे गुंतवणूक करा, आयुष्यभर खात्यात दर महिन्याला 50,000 रुपये जमा होतील

Investment Tips

Investment Tips | जर तुम्ही गुंतवणुकीसाठी एक सुरक्षित आणि हमखास परतावा देणारी योजना शोधत असाल, तर आज आम्ही तुम्हाला या लेखात एलआयसीच्या अशा प्लानबद्दल माहिती देणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला दर महिन्याला पैसे मिळत राहतील.

LIC सरल पेन्शन योजना:
LIC द्वारे अनेक प्रकारच्या पॉलिसी योजना चालवल्या जातात. जर तुम्हीही हमखास परतावा देणारी योजना शोधत असाल तर, आज आम्ही तुम्ही LIC चे गुंतवणूक प्लॅन नक्कीच तपासले पाहिजे. LIC च्या अश्या अनेक योजना आहेत,ज्यामध्ये तुम्हाला दर महिन्याला पैसे मिळत राहतील. अश्याच एका पॉलिसीचे नाव “सरल पेन्शन योजना” आहे. या योजनेत तुम्हाला वयाच्या 40 व्या वर्षापासून पेन्शन मिळायला सुरुवात होईल. चला तर मग जाणून घेऊ या जबरदस्त योजनेबद्दल

फक्त एकदाच प्रीमियम भरावा लागेल :
हा LIC द्वारे संचालित एक प्रकारचा सिंगल प्रीमियम पेन्शन प्लान आहे. ज्यामध्ये तुम्हाला फक्त एकदाच प्रीमियम भरावा लागेल, आणि तुम्ही आयुष्यभर याच्या माध्यमातून पैसे कमवू शकता. पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर एकल प्रीमियमची रक्कम नॉमिनीला परत केली जाईल. सरल पेन्शन योजना ही एक साधी आणि सोपी वार्षिकी योजना आहे. याचा अर्थ तुम्ही पॉलिसी घेताच तुम्हाला पेन्शन सुरू होऊन जाईल. ही पॉलिसी घेतल्यानंतर जेवढी पेन्शन सुरुवातीला मिळते, तेवढीच पेन्शन तुम्हाला आयुष्यभर मिळत राहील.

योजना लाभ कसा घ्यावा :
सिंगल लाईफ प्लॅनमध्ये पॉलिसी कोणाच्याही नावावर राहू शकते. जोपर्यंत पेन्शनधारक जिवंत आहे तोपर्यंत त्याला पेन्शन मिळत राहील, त्याच्या मृत्यूनंतर बेस प्रीमियमची रक्कम त्याच्या नॉमिनीला परत केली जाईल.

जॉइंट लाइफ प्लॅनमध्ये दोन्ही जोडीदारांना कव्हरेज दिले जाईल. जोपर्यंत प्राथमिक निवृत्तीवेतनधारक जिवंत आहेत, तोपर्यंत त्यांना निवृत्ती वेतन मिळत राहील. त्याच्या मृत्यूनंतर, त्याच्या जोडीदाराला आयुष्यभर पेन्शन मिळत राहील, त्याच्या मृत्यूनंतर मूळ प्रीमियमची रक्कम त्याच्या नॉमिनीला परत दिली जाईल.

योजनेचे वैशिष्ट्य काय आहे :
या पेन्शन योजनेच्या लाभासाठी किमान वयोमर्यादा 40 वर्षे आणि कमाल वय 80 वर्षे आहे. ही एक संपूर्ण जीवन पॉलिसी आहे, म्हणून पेन्शन संपूर्ण आयुष्यासाठी दिली जाते. सरल पेन्शन पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांनंतर कधीही सरेंडर करता येते, आणि योजना थांबवता येते. या प्लॅन मध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्ही दरमहा एक ठराविक रक्कम पेन्शन म्हणून घेऊ शकता. याशिवाय, ते त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर देखील घेतले जाऊ शकते.

मासिक पेन्शन कशी मिळेल, आपण पाहू :
जर तुम्हाला दरमहा नियमित 50000 रुपये पेन्शन हवी असेल तर तुमचे वय 40 वर्षांचे असताना तुम्ही 10 लाख रुपयांचा सिंगल प्रीमियम जमा करून, तुम्हाला वार्षिक 50250 रुपये पेन्शन सुरू होईल, जी आयुष्यभर सुरू राहील. किमान पेन्शन रक्कम 12000 रुपये असेल तर, या योजनेत पेन्शनची कोणतीही कमाल मर्यादा नाही. याशिवाय, जर तुम्हाला तुमची गुंतवणूक केलेली रक्कम मधूनच हवी असेल, तर अशा परिस्थितीत, 5 टक्के दंड शुल्क कपात केल्यानंतर, तुम्हाला जमा केलेली रक्कम परत दिली जाईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Investment Tips in LIC Saral Jeevan pension policy for regular pension on 10 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Investment Tips(145)#LIC(66)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या