4 December 2024 12:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड-न्यूज, 53% डीएसह 2 भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली
x

धक्कादायक! बॉम्बस्फोटातील आरोपी याकूबच्या चुलतभावासोबत गृहमंत्री फडणवीस यांचे संबंध?, तर राज्यपालांसोबतही स्वागत सत्काराचे फोटो

Rauf Memon

Yakub Memon Kabar | दक्षिण मुंबईतील मरीन लाइन्स स्थानकासमोर बडा कब्रीस्तान स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीतच मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याला दफन करण्यात आले. याकूब मेमनची कबर सजवण्यात आली आहे. कबर सजवण्यासा परवानगी कुणी दिली यावरुन आता चांगलाच वाद पेटला आहे.

कबर सजवण्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. याकूबचा भाऊ टायगर मेमनच्या धमकीनंतर ही कबर सजवण्यात आल्याचा दावा बडा कब्रीस्तान ट्रस्टच्या एका माजी विश्वस्ताने केला आहे. याबाबत पोलिसात तक्रार केल्याचेही समजते. याकूबची कबर शहीदाच्या स्मारकाने सजवा असं म्हणत ही कबर सजवण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप या विश्वस्ताने केला आहे. टायर मेमन सध्या फरार आहे.

एकाबाजूला शिवसेनेला घेरणारी भाजपाची नेते मंडळी आता स्वतःच या ट्रॅपमध्ये अडकल्याचं पाहायला मिळतंय. किशोरी पेडणेकर यांनी रऊफ मेमन आणि राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा एक फोटो ट्वीट केला आहे. आरोप करणाऱ्या भाजपच्या बारा तोंडांनी या फोटोला कॅप्शन द्यावे खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे. तर, काँग्रेसने रऊफ मेमन आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा फोटो ट्वीट केला आहे.

किशोरी पेडणेकर यांनी देवेंद्र फडणवीस आणि रऊफ मेमन याचा फोटो ट्वीट केला. भारतीय जनता पार्टीच्या बारा तोंडाने दुसऱ्यावर आरोप करणाऱ्यांनी या फोटोवर कॅप्शन द्यावे असे टोलाही त्यांनी लगावला. किशोरी पेडणेकर यांनी ट्वीट केलेल्या फोटोत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेदेखील दिसत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shivsena and Congress hit back to BJP tweet photo Rauf Memon with Devendra Dadnavis and governor Koshyari check details 10 September 2022.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x