21 November 2024 8:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Penny Stocks | या 3 रुपयांच्या पेनी शेअरने केली कमाल, अवघ्या 15 दिवसांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट, हा स्टॉक आहे खूप स्वस्त

Penny Stocks

Penny Stocks | आज आम्ही या लेखात तुम्हाला अशा एका पेनी स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने फक्त 15 दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. 2020 कोविड नंतरच्या काळापासून, अनेक पेनी स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना छप्पर फाड परतावा दिला आहे.

15 दिवसात गुंतवणूक झाली दुप्पट : DCM Financial Services Share Price
आपण ज्या स्टॉक बद्दल चर्चा करत आहोत त्या स्टॉकचे नाव आहे, “DCM Financial Services”. स्टॉकने फक्त 15 दिवसात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. या शेअर्सनी मागील 15 दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 101 टक्के परतावा मिळवून दिला आहे. जर तुम्ही 15 दिवसांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवणूक केली असती,तर आता तुम्हाला तब्बल दुप्पट म्हणजे 2 लाख रुपये परतावा मिळाला असता. मागील ट्रेडिंग सेशन मध्येही या शेअरच्या किमतीत तब्बल 4.44 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. त्यानंतर हा शेअर 7.05 रुपये किमतीवर जाऊन बंद झाला आहे. त्याच वेळी, मागील 5 दिवसांत ह्या शेअरची किंमत तब्बल 19.49 टक्क्यांनी वाढली आहे.

एका महिन्यातील स्टॉकची कामगिरी :
10 ऑगस्ट रोजी या स्टॉकचे मूल्य फक्त 3.60 रुपये होते. त्याच वेळी, एका महिन्यात स्टॉकमध्ये 95.83 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. या कालावधीत शेअरच्या किमतीत तब्बल 3.45 रुपयांची वाढ झाली आहे. मागील 6 महिन्यांचा चार्ट पाहिला तर शेअरमध्ये तब्बल 80.77 टक्के वाढ झाली आहे.

1 वर्षात शेअरमध्ये 206 टक्क्यांची वाढ :
जर तुम्ही वार्षिक दर सरासरी वाढ पाहिली तर या शेअर्समध्ये तब्बल 85.53 टक्क्यांची वाढ झालेली दिसेल. त्याच वेळी, जर तुम्ही मागील एका वर्षाच्या चार्टवर नजर टाकली तर, 9 सप्टेंबर 2021 रोजी शेअरची किंमत 2.30 रुपये होती. कंपनीच्या शेअरमध्ये एका वर्षात तब्बल 206.52 टक्क्यांची वाढ झालेली दिसेल. या कालावधीत स्टॉक 4.75 रुपयेच्या किंमत पातळीवर पोहोचला आहे.

उच्चांकी आणि नीचांकी किंमत :
ह्या शेअर्सची मागील 52 आठवड्यांची विक्रमी उच्चांक किंमत पातळी 7.05 रुपये आहे. याशिवाय 52 आठवड्यांची नीचांकी पातळी किंमत फक्त 2.25 रुपये आहे. या कंपनीच्या स्टॉकने 22 मार्च 2018 पासून आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 227.91 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stocks DCM Financial Services share price return on 10 September 2022.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x