22 November 2024 5:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Video Viral | राणा दाम्पत्याकडून हिंदू धर्माच्या प्रथांचा भयंकर अपमान, विसर्जनावेळी दोघांनी गणपती बाप्पाची मूर्ती वरून पाण्यात फेकली

MP Navneet Rana

MP Navneet Rana | गणेश चतुर्थीपासून सुरू झालेला गणेशोत्सव 10 दिवसांनंतर अनंत चतुर्दशीला संपतो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्री गणेशाचे विसर्जनही केले जाते. संपूर्ण देशात अनंत चतुर्दशीचा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. काल 9 सप्टेंबर रोजी शुक्रवारी अनंत चतुर्दशी असल्याने बाप्पाचे विसर्जन देखील हिंदू धर्मातील प्रथेनुसार कसं करावं हे देखील तितकंच महत्वाचं आहे.

हिंदू धर्मानुसार गणपती विसर्जन कसे केले जाते :
विसर्जन विधीमध्ये गणपतीची आरती करून उत्तर पूजा केली जाते. गणपतीवर अक्षता, फुले वाहिले जातात. त्यानंतर मूर्ती हलविली जाते. मूर्तीत प्राणप्रतिष्ठा केल्यावर त्यात गणरायाचे वास्तव्य मानले जाते. ते उत्तर पूजेनंतर मूर्ती हलवेपर्यंतच असते. एवढ्या दिवस श्रध्देने मनोभावे पूजलेल्या या मूर्तीला नंतर पाण्यात एका सुज्ञ व्यक्तीने पाण्यात उतरवून बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करायचे असते. समुद्र तलाव किंवा नदीत अशाप्रकारे हिंदू धर्माप्रमाणे नियम पाळले जातात.

बाप्पाची मूर्ती विसर्जन करताना पाण्यात फेकायची नसते :
समुद्र नदी किंवा जवळपास नसेल तर विसर्जनाकरिता कृत्रिम कुंड बनवली जातात आणि विसर्जयापूर्वी या कुंडांमध्ये तुळशीची रोपं फुलं सोडली जातात. परंतु हाताने सौम्य पणे गणपती बाप्पाला दोन्ही हाताने एखादी घरातील व्यक्ती किंवा समाज सेवी संस्थेनी नेमलेली व्यक्ती पाण्यात विसर्जन करते. मात्र समुद्र, नदी, तलाव किंवा कृत्रिम कुंड अशा कोणत्याही ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती विसर्जन करताना पाण्यात फेकायची नसते असं हिंदू धर्म सांगतो. तसे केल्यास तो हिंदू धर्माचा आणि गणपती बाप्पाचा अपमान मानला जातो.

धक्कादायक प्रकार समोर :
तसाच एक धक्कादायक प्रकार अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे संतापाची लाट येण्याची शक्यता आहे. हिंदुत्वावर नेहमी स्टंटबाजी करणाऱ्या या दाम्पत्याने विसर्जनाच्यावेळी गणपती बाप्पाची मुर्त्यू अक्षरशः पाण्यात फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एखाद्या व्यक्तीला मदत देऊन त्याला हिंदू धर्माच्या प्रथेनुसार पाण्यात गणपती बाप्पाचे विसर्जन करून न घेता पती पत्नीने बाप्पाची मूर्ती थेट वरून खाली पाण्यात फेल्याच स्पष्ट होतंय. त्यामुळे या पती पतींच्या ढोंगी हिंदुत्वाचा चेहरा समोर आला आहे. त्यामुळे विरोधक त्यांना लक्ष करण्याची शक्यता आहे.

तुम्हीच पहा व्हिडिओ :

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: MP Navneet Rana in focus again over Ganapati Bappa visarjan viral video check details 10 September 2022.

हॅशटॅग्स

#Navneet Kaur Rana(19)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x