12 December 2024 5:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON
x

Post Office FD | पोस्ट ऑफिसमध्ये एफडी गुंतवणूक करण्यासाठी जाणून घ्या आकर्षक व्याजदर आणि हे सर्व फायदे मिळतील

Post office FD

Post Office FD | जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये एफडी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटपेक्षा चांगला पर्याय दुसरा कुठला असूच शकत नाही. POTD योजना पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजना म्हणूनही ओळखली जाते. ही योजनाही एखाद्या बँकेतील एफडीसारखीच आहे. विशेष बाब म्हणजे या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या लोकांना मुदत पूर्ण झाली की व्याज परतावा मिळतो. कोणताही भारतीय नागरिक पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन टाइम डिपॉझिट खाते उघडून गुंतवणूक करू शकतो. या योजनेत रोख पैसे भरून आणि धनादेशाने दोन्ही पद्धतीने खाते उघडता येते. तर चेकची तारीख ही खाते उघडण्याची तारीख म्हणून नोंदवली जाते.

हे FD खाते उघडण्यासाठी किमान गुंतवणूक मर्यादा रक्कम 1,000 आहे तर कमाल गुंतवणूक मर्यादा नाही. हे खाते जास्तीत जास्त तीन व्यक्ती संयुक्तपणे उघडू शकतात. त्याच वेळी, कोणतीही व्यक्ती कोणत्याही निर्बंधांशिवाय एका पेक्षा अधिक खाती उघडू शकते. याशिवाय, तुम्ही योजना खाते एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये सहज ट्रान्सफर करू शकता.

कालावधी लॉक करा :
कोणतीही व्यक्ती या योजनेत एक, दोन, तीन किंवा पाच वर्षांच्या कालावधीसाठी आपले पैसे गुंतवू शकते. त्याच वेळी, पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज करून गुंतवणुकीचा कालावधी देखील वाढविला जाऊ शकतो.

पोस्ट ऑफिस मुदत ठेवीवरील व्याजदर :
या योजनेतील व्याज दर सरकार द्वारे नियमितपणे सुधारित केले जातात. आणि त्रैमासिक आधारावर व्याज परताव्याची गणना केली जाते. व्याज पेमेंट वार्षिक आधारावर दिले जाते. आर्थिक वर्ष 2021-22 च्या दुसऱ्या तिमाहीत पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट्ससाठी नवीन सुधारित व्याज दर खालीलप्रमाणे आहेत:

* 1 वर्ष – 5.5 टक्के वार्षिक
* 2 वर्षे – 5.5 टक्के वार्षिक
* 3 वर्षे – 5.5 टक्के वार्षिक
* 5 वर्षे – 6.7 टक्के वार्षिक

गुंतवणुकीवर आयकर सवलत :
या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ठेवीदाराना आयकर सवलतीचा लाभ मिळू शकतो. आयकरअधिनियम, 1961 च्या कलम 80C अंतर्गत, 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या सवलतीचा दावा केला जाऊ शकतो. ही सूट केवळ पाच वर्षांच्या लॉक-इन कालावधीसाठी उपलब्ध आहे.

पैसे काढण्याचे नियम :
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटमध्ये, गुंतवणूक सुरू केल्याच्या 6 महिन्यांच्या आता जमा केलेली रक्कम काढण्याची परवानगी नाही. सहा महिने ते 12 महिन्यांच्या दरम्यान रक्कम काढल्यास त्यावर तुम्हाला बचत खात्यावर जेवढे व्याज मिळते तेवढेच व्याज मिळेल. ही पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना अशा लोकांसाठी खूप जबरदस्त आहे, ज्यांना त्यांचे पैसे इतर धोकादायक आणि जोखीमच्या योजनांमध्ये गुंतवायचे नाहीत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Post office FD scheme investment benefits on 11 September 2022.

हॅशटॅग्स

Post office FD(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x