23 November 2024 10:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज तेजीने मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL
x

Multibagger Stocks | गुंतवणूकदारांना 5318 टक्के परतावा आणि त्यानंतर प्रति शेअर 100 टक्के लाभांश, याला म्हणतात लॉटरी स्टॉक

Multibagger Stocks

Multibagger Stocks | आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिल्यानंतर ही रासायनिक उद्योगातील कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश वितरीत करणार आहे. ही एक मिड कॅप कंपनी असून तिचे बाजार भांडवल तब्बल 6,924.37 कोटी रुपये आहे.

मल्टीबॅगर स्टॉक:
मागील काही महिन्यात जबरदस्त परतावा दिल्यानंतर, रासायनिक उद्योगातील ह्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश वितरित करण्याची घोषणा केली आहे. आपण ज्या कंपनीबद्दल चर्चा करत आहोत, ती कंपनी आहे गुजरात अल्कलीज अँड केमिकल्स लिमिटेड. ही एक मिड कॅप कंपनी असून तिचे बाजार भांडवल 6,924.37 कोटी रुपये आहे. कंपनीचा स्टॉकची किंमत सध्या 945.50 रुपये आहे. या शेअर्सनी आतापर्यंत आपल्या भागधारकांना सर्वाधिक म्हणजे 5,318.34 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

लाभांश घोषणा :
कंपनीच्या संचालक मंडळाने 49 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत फाइलिंगमध्ये म्हटले आहे की कंपनी प्रति शेअर 10 रुपये म्हणजे तब्बल 100 टक्के दराने आपल्या भागधारकांना लाभांश वितरीत करेल. लाभांश देण्याची रेकॉर्ड तारीख 29.09.2022. घोषित करण्यात आली आहे.

शुक्रवारी NSE वर कंपनीच्या शेअर्सची किंमत 945.50 रुपये होती. मागील 23 वर्षांमध्ये या स्टॉकची किंमत 17.45 रुपये वरून सध्याच्या 945.50 रुपये किंमतीपर्यंत जाऊन पोहोचली आहे. म्हणजेच, या काळात या शेअर्सनी आपल्या भागधारकांना तब्बल 5,318.34 टक्के इतका जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. मागील पाच वर्षांत ह्या स्टॉकमध्ये 89.69 टक्के वाढ झाली आहे. मागील तीन वर्षांत या शेअर्स नी आपल्या भागधारकांना तब्बल 118.02 टक्के मल्टीबॅगर परतावा मिळवून दिला आहे. शेअर्सनी मागील वर्षाच्या तुलनेत चालू वर्षी 103.09 टक्केचा मल्टीबॅगर परतावा मिळवून दिला आहे. आणि सरासरी वार्षिक दर वाढ या आधारावर 2022 मध्ये आतापर्यंत 44.62 टक्केची वाढ पाहायला मिळाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks Gujarat Alkalies and Chemicals share price return on 12 September 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(455)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x