19 April 2025 12:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Mutual Funds | या 8 म्युचुअल फंडांनी 3 वर्षात 40 टक्के परतावा दिला, 10 हजारांच्या SIP'ने 5.8 लाख रुपये परतावा दिला, यादी सेव्ह करा

Mutual funds

Mutual funds| म्युच्युअल फंड एसआयपी कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही खालील पैकी कोणत्याही म्युचुअल फंडामध्ये 10,000 रुपयांची मासिक एसआयपी केली असती, तर तुम्हाला 30 टक्के परताव्यासह तीन वर्षांत 5.8 लाख रुपयांपेक्षा जास्त नफा झाला असता.

सर्वोत्तम कामगिरी करणारे म्युच्युअल फंड :
अनेक ग्रोथ इक्विटी-ओरिएंटेड मिड-कॅप म्युच्युअल फंडांनी मागील 3 वर्षांत जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, मागील तीन वर्षांत किमान आठ असे मिड-कॅप म्युचुअल फंड आहेत, ज्यांनी 30 टक्के किंवा त्याहून अधिक परतावा कमावून दिला आहे. म्युच्युअल फंड एसआयपी कॅल्क्युलेटरनुसार, जर यापैकी कोणत्याही फंडामध्ये तुम्ही फक्त 10,000 रुपयांची मासिक एसआयपी गुंतवणूक केली असती, तर तुम्हाला 30 टक्के परताव्यासह तीन वर्षांत 5.8 लाख रुपये मिळाले असते. इतकेच नाही तर यापैकी दोन मिड-कॅप म्युचुअल फंडांचा अंदाजे वार्षिक परतावा 40 टक्के पेक्षा जास्त होता. या लेखात आपण काही मिड-कॅप फंड ची माहिती घेणार आहोत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना 30 टक्के आणि त्याहूनही अधिक परतावा मिळवून दिला आहे.

या मिड-कॅप म्युचुअल फंडांनी दिलेला परतावा :
1) एडलवाईस मिड कॅप फंड :
या योजनेच्या डायरेक्ट प्लॅन मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांस 3 वर्षांत 32.05 टक्के परतावा मिळाला आहे. SIP मध्ये त्याच कालावधीत 30.04 टक्के परतावा मिळाला आहे. हा म्युचुअल फंड “निफ्टी मिडकॅप 150” यांचा एकूण परतावा निर्देशांक फॉलो करतो.

2) कोटक इमर्जिंग इक्विटी फंड :
या योजनेच्या डायरेक्ट प्लॅन योजनेने 3 वर्षांत 31.11 टक्के परतावा मिळवून दिला आहे. तर SIP योजनेने त्याच कालावधीत 29.47 टक्के परतावा मिळवून दिला आहे. हा फंड “निफ्टी मिडकॅप 150” यांचा एकूण परतावा निर्देशांक फॉलो करतो.

3) मिरे अॅसेट मिडकॅप फंड :
या योजनेच्या डायरेक्ट प्लॅन ने 3 वर्षात 32.09 टक्के परतावा मिळवून दिला आहे. तर SIP योजनेने त्याच कालावधीत 30.14 टक्के परतावा मिळवून दिला आहे. हा म्युचुअल फंड “निफ्टी मिडकॅप 150” यांचा एकूण परतावा निर्देशांक फॉलो करतो.

4) मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंड :
या योजनेच्या डायरेक्ट प्लॅनने मागील 3 वर्षात 30.97 टक्के परतावा मिळवून दिला आहे. तर SIP योजनेने त्याच कालावधीत 29.41 टक्के परतावा मिळवून दिला आहे.हा म्युचुअल फंड निफ्टी मिडकॅप 150 चा परतावा निर्देशांक फॉलो करतो.

5) पीजीआयएम इंडिया मिडकॅप फंड :
या योजनेच्या डायरेक्ट प्लॅन ने मागील 3 वर्षात 44.29 टक्के परतावा मिळवून दिला आहे. तर SIP योजनेने त्याच कालावधीत 41.76 टक्के परतावा मिळवून दिला आहे. हा फंड निफ्टी मिडकॅप 150 परतावा निर्देशांक फॉलो करतो.

6) क्वांट मिड कॅप फंड :
या योजनेच्या डायरेक्ट प्लॅनने मागील 3 वर्षात 40.56 टक्के परतावा मिळवून दिला आहे. तर SIP योजनेत त्याच कालावधीत 37.88 टक्के परतावा मिळवून दिला आहे. हा फंड निफ्टी मिडकॅप 150 परतावा निर्देशांक फॉलो करतो.

7) एसबीआय मॅग्नम मिडकॅप फंड :
या योजनेच्या डायरेक्ट प्लॅन ने मागील 3 वर्षांत 33.69 टक्के परतावा मिळवून दिला आहे. तर SIP योजनेने त्याच कालावधीत 32.49 टक्के परतावा मिळवून दिला आहे. हा फंड निफ्टी मिडकॅप 150 चा परतावा निर्देशांक फॉलो करतो.

8) UTI मिड कॅप फंड :
या योजनेच्या डायरेक्ट प्लॅन ने मागील 3 वर्षांत 30.28 टक्के परतावा मिळवून दिला आहे. तर SIP योजनेने त्याच कालावधीत 29.06 टक्के परतावा मिळवून दिला आहे. हा फंड निफ्टी मिडकॅप 150 चा परतावा निर्देशांक फॉलो करतो.

गुंतवणूक करण्याची योजना :
AMFI च्या ऑगस्टच्या आकडेवारीनुसार, निव्वळ प्रवाहाच्या बाबतीत ह्या मिड कॅप फंडचा समावेश टॉप पाच इक्विटी योजनांमध्ये होतो. ऑगस्टमध्ये मिडकॅप फंडातील एकूण गुंतवणूक 1489 कोटी रुपये होती. गुंतवणूकदारांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की म्युचुअल फंडाची भूतकाळातील कामगिरी भविष्यातही वाढतीच राहील अशी हमी देत ​​नाही. म्युच्युअल फंडात कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही नेहमी तुमचे संशोधन केले पाहिजे आणि आर्थिक तज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Mutual Funds investment opportunities and benefits on 12 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Mutual Funds(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या