Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या योजनेतील फक्त 50 रुपयांच्या गुंतवणुकीवर 35 लाखांचा परतावा मिळेल, योजनेचा लाभ घेतला का?
Post Office Scheme | आपल्याला सर्वांना गुंतवणूक करताना सुरक्षित योजना आणि हमखास परतावा हवा असतो. आपण गुंतवणुकीसाठी वेगवेगळे पर्याय शोधत असतो. मुदत ठेव योजना, भविष्य निर्वाह निधी अश्या अनेक गुंतवणूक योजना बाजारात उपलब्ध आहेत. शेअर बाजाराचे पुरेसे ज्ञान नसल्यामुळे किंवा जोखीम असल्यामुळे आपण स्टॉक मध्ये गुंतवणूक न करता, सरकारी योजना मध्ये गुंतवणूक करतो, कारण ते सुरक्षित असतात, आणि हमखास परतावा देतात. अश्याच काही गुंतवणूक योजना पोस्ट ऑफिस तर्फेदेखील राबवल्या जातात. चला तर मग जाणून घेऊ पोस्ट ऑफिस च्या गुंतवणूक योजनाबद्दल.
ग्राम सुरक्षा योजना :
आर्थिक फसवणुक टाळण्यासाठी लोक कोणत्याही नवीन योजनेत गुंतवणूक करण्यास घाबरतात. परंतु असेही काही लोक असतात ज्यांना गुंतवणूक करायची असते पण त्यांच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी हवी तेवढी रक्कम उपलब्ध नसते. या लेखात आपण अश्या लोकांना पोस्ट ऑफिस मधील गुंतवणूक योजनेबद्दल सविस्तर माहिती देतो. दोन लोकांच्या समस्या दूर करतो. पोस्ट ऑफिस च्या अश्या काही योजना आहेत, ज्यामध्ये गुंतवणूक करणे खूप सुरक्षित तर आहेच, सोबत हमखास परतावा देखील मिळतो. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला फक्त प्रतिदिन 50 रुपये जमा करावे लागेल. इंडिया पोस्ट म्हणजेच आपले भारतीय डाक खाते अनेकदा विविध प्रकारच्या लहान गुंतवणूक योजना राबवत असते. या सरकारी योजनेत गुंतवणूक करून तुम्ही भरघोस परतावा कमवू शकता. आपण ज्या पोस्ट ऑफिस च्या गुंतवणूक योजनेबद्दल चर्चा करत आहोत, त्या योजनेचे नाव आहे “ग्राम सुरक्षा योजना”. या अंतर्गत तुम्ही फक्त 50 रुपये गुंतवून दीर्घकाळात 35 लाख रुपयेचा परतावा मिळवू शकता.
इंडिया पोस्टद्वारे संचालित :
इंडिया पोस्टच्या या सरकारी गुंतवणूक योजनेत पैसे जमा करणे पूर्णपणे सुरक्षित आहे. या छोट्या गुंतवणुकीत दीर्घ काळ गुंतवणूक करत राहिल्यास तुम्हाला मोठा व्याजासकट भरघोस परतावा मिळू शकतो. या गुंतवणूक योजनेच्या माध्यमातून तुमची बचत ही सुरू होईल. सरकारने भारतीय पोस्ट ऑफिसच्या ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना कार्यक्रमांतर्गत ही अद्भुत योजना सुरू केली होती. समजा योजना चालू असताना गुंतवणूकदाराचा मृत्यू झाला,तर चिंतेचे काही कारण नाही. योजनेतील गुंतवणुकीचे पैसे त्याच्या नॉमिनी सदस्याला दिले जातील.
गुंतवणुकीच्या अटी आणि नियम :
या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी किमान वय 19 वर्षे आणि कमाल वय 55 वर्षे असावे. या वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक पोस्ट ऑफिस च्या या गुंतवणूक योजनेत किमान 10 हजार रुपयांपासून ते कमाल 10 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतो. तुमच्या सोयीनुसार, तुम्ही “ग्राम सुरक्षा योजनेत” गुंतवणुकीचा हप्ता मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक पद्धतीने जमा करू शकता. समजा तुम्ही वयाच्या 19 व्या वर्षापासून या योजनेत गुंतवणूक करायला सुरुवात केली असेल तर 55 वर्षांपर्यंत तुम्हाला मासिक 1515 रुपये प्रीमियम भरावा लागेल, जेणेकरून तुम्हाला मॅच्युरिटीवर 31.60 लाख रुपये परतावा मिळू शकेल. दुसरीकडे, 60 वर्ष वयापर्यंत मासिक प्रीमियममध्ये तुम्हाला 1411 रुपये जमा करावे लागेल, तर तुम्हाला 34.60 लाख रुपये परतावा मिळू शकतो.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Post Office scheme Gram Suraksha Yojana investment opportunity for long term on 14 September 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार