24 November 2024 2:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, नव्या वर्षात पगारात 186 टक्क्यांनी वाढ होणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259 Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
x

राज्यातील जिल्ह्यांना पालकमंत्री देऊ न शकलेल्या शिंदे सरकारमधील उद्योग मंत्री म्हणाले, वेदांता पेक्षा मोठा प्रकल्प राज्याला देऊ

Vedanta Project

Minister Uday Samant | राज्यामध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने नवे सरकार राज्यात आले. जवळपास ही उलथापालथ होऊन तीन महिन्याचा काळ उलटत आहे. मात्र, नवे सरकार येताच जुन्या कामांना स्थगिती देण्यात आली. याशिवाय जिल्हा वार्षिक नियोजन खर्चाला मज्जाव केल्याने विकासाला ब्रेक लागला आहे. ऐन पावसाळ्यात सरकारचा गाडा चिखलात रुतल्याची गट निर्माण झाली आहे. त्यातच जिल्ह्याला पालकमंत्री जाहीर होत नसल्याने अनेक निर्णय घेण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा ताटकळत बसली आहे. एकाबाजूला राज्यातील जिल्ह्यांना पालकमंत्री न देऊ शकलेल्या शिंदे सरकारमधील मंत्र्यांची केविलवाणी वक्तव्य येतं आहेत.

वेदांता-फॉक्सक्वान प्रकल्प गुजरातला गेल्याने शिंदे सरकारवर प्रचंड टीका सुरु झाली आहे, त्यानंतर शिंदे सरकारमधील मंत्री काही सुचत नसल्याने आणि काही तरी सांगायचं म्हणून बचावाच्या प्रतिक्रिया देतं आहेत असंच म्हणावं लागेल. शिंदे गटातील उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले आता शिंदे सरकारवर जे खापर फोडण्यात येते आहे ते चुकीचे आहे. त्यामुळे हा प्रकल्प गुजरातला गेला असला तरी यापेक्षा मोठा प्रकल्प राज्याला देऊ असा विश्वास उदय सामंत यांनी यावेळी दिला आहे. त्यामुळे एकाबाजूला राज्यातील जिल्ह्यांना पालकमंत्री न देऊ शकलेल्या शिंदे सरकारमधील मंत्र्यांची राजकीय अवस्था दिसून येते आहे.

मनसेची प्रतिक्रिया :
दरम्यान, वेदांता सारखा प्रकल्प राज्याबाहेर जातो याची चौकशी झाली पाहिजे. हा प्रकल्प राज्यात राहिला असता तर राज्यातील तरुणांना रोजगार मिळाले असते. यात कोणीही राजकारण करू नका, असंही मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Vedanta Project politics in Maharashtra state check details 15 September 2022.

हॅशटॅग्स

#Vedanta Project(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x