Multibagger Stocks | या शेअरने 5 आठवड्यात 105 टक्के परतावा दिला, आता फ्री बोनस शेअर्स जाहीर, पैसा वेगाने वाढवतोय हा स्टॉक
Multibagger Stocks | गेल्या एक महिन्यात शेअर बाजारात थोडी फार स्थिरता येताना दिसत आहे. ह्याचा सकारात्मक परिणाम बऱ्याच स्टॉक मध्ये दिसत आहे. फक्त एका महिन्यात, ज्योती रेझिन्स कंपनीच्या स्टॉकने आपल्या भागधारकांना 80 टक्के पेक्षा अधिक परतावा दिला आहे. या कंपनीने फक्त 5 आठवड्यांमध्ये कमालीची कामगिरी केली आहे. स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 105 टक्केचा भरमसाठ परतावा मिळवून दिला आहे. खूप कमी कालावधीत ह्या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. 2022 या वर्षाच्या सुरुवातीपासून ज्योती रेझिन्सच्या शेअर्सने आपल्या भागधारकांना सुमारे 380 टक्क्यांचा नफा कमावून दिला आहे.
ज्योती रेजिन्स अँड अॅडेसिव्ह लिमिटेड :
अस्थिरतेचे वातावरण हटल्यावर केमिकल आणि फार्मा कंपन्या शेअर बाजारात सकारात्मक कामगिरी करताना दिसत आहे. रासायनिक उद्योगाशी संबंधित कंपनी ज्योती रेजिन्स अँड अॅडेसिव्ह लिमिटेडच्या शेअर्समध्ये मागील 5 दिवसांत कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. 14 सप्टेंबर रोजी, ट्रेडिंग च्या सुरुवातीलाच कंपनीच्या स्टॉकने अप्पर सर्किटला स्पर्श केला होता. आणि या वाढीसह BSE निर्देशांकावर स्टॉकमध्ये 5 टक्क्यांची वाढ झाली आणि त्यावेळी शेअर 1,769.70 रुपयांवर ट्रेड करत होते.
मागील 5 दिवसांच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सतत अपर सर्किट लागल्यामुळे कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत कमालीची वाढ झाली पाहायला मिळाली आहे. शेअर्स मध्ये फक्त पाच दिवसात जवळपास 26 टक्क्यांची वाढ झाली. सध्या BSE वर ज्योती रेजिन्सचे शेअर्स 4 टक्क्यांच्या जबरदस्त वाढीसह 1753 रुपयांच्या किमतीवर ट्रेड करत आहेत.
परतावा कामगिरी :
ज्योती रेजिन्स कंपनीच्या स्टॉकने फक्त 1 महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना जवळपास 80 टक्के पेक्षा अधिक नफा कमावून दिला आहे. शेअर बाजारातील भरमसाठ परतावा देणाऱ्या कंपनीच्या कामगिरीवर नजर टाकल्यास आपल्याला समजेल की हे स्टॉक मागील काळात झालेल्या पडझडीनंतर आता बाऊन्स बॅक करत आहेत. ज्योती रेजिन्सनेही एक महिन्यात 80 टक्के परतावा दिला आहे. कंपनीने मागील 5 आठवड्यांत 105 टक्के परतावा दिला आणि ह्याचा परिणाम स्वरूप गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहे. 2022 या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत ज्योती रेझिन्सच्या शेअर्समध्ये 380 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. तर दुसरीकडे, गेल्या वर्षी ह्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 525 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला होता.
गुंतवणूकदारांना झालेला लाभ : ज्योती रेजिन्सच्या शेअरहोल्डर्सना कमालीचे फायदे मिळाले आहेत. जर तुम्ही 2022 या वर्षाच्या सुरुवातीला ज्योती रेजिन्स या कंपनीच्या शेअर्समध्ये फक्त 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 4.70 लाख रुपये पेक्षा अधिक झाले असते. त्याचवेळी, एक वर्षभरापूर्वी या कंपनीमध्ये केलेल्या एक लाख रुपये गुंतवणुकीचे बाजार मूल्य सध्या 6.26 लाख रुपयांनी वाढले असते.
पाच आठवड्यात दुप्पट परतावा : अवघ्या पाच आठवड्यात ह्या स्टॉक मध्ये गुंतवणूक केलेल्या लोकांचे पैसे आता दुप्पट झाले आहेत. जर तुम्ही 5 आठवड्यांपूर्वी ह्या स्टॉकमध्ये एक लाख रुपये लावले असते, तर आज तुमचे गुंतवणूक मूल्य 2 लाखांपेक्षा अधिक झाले असते.
भागधारकांना मिळणार बोनस : ज्योती रेजिन्स अँड अॅडेसिव्ह लिमिटेड ही एक स्मॉल कॅप स्पेशालिटी केमिकल कंपनी असून तिचे बाजार भांडवल 2.11 हजार कोटी रुपये आहे. कंपनीने नुकतेच आपल्या भागधारकांना 2:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करण्याची घोषणा केली आहे. 8 सप्टेंबरपासून त्यांचे कंपनी एक्स-बोनस म्हणून ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Multibagger Stocks of Jyoti Resins share price return on 15 September 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार