23 November 2024 3:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Vikram Vedha | 'विक्रम वेधा' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला, आता बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी चित्रपट सज्ज

Vikram Vedha

Vikram Vedha |  ‘विक्रम वेधा’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून, बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी चित्रपट सज्ज झाला आहे. दरम्यान, येत्या 30 सप्टेंबर रोजी ‘विक्रम वेधा’ चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे, ‘विक्रम वेध’ जगभरातील 100 हून अधिक देशांमध्ये रिलीज होणार आहे तर असं करणारा हा बॉलिवूडमधील चित्रपटासाठी सर्वात मोठा ओपनिंग ठरणार आहे.

लवकरच चित्रपट प्रदर्शित होणार :
दरम्यान, फ्रायडे फिल्मवर्क्स आणि YNOT स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने गुलशन कुमार, तसेच टी-सीरीज फिल्म्स आणि रिलायन्स एंटरटेनमेंट यांनी बहुप्रतिक्षित ‘विक्रम वेध’ सादर केला आहे. विक्रम वेधा या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केले आहे, तर एस शशिकांत आणि भूषण कुमार यांनी निर्मिती केली आहे. या चित्रपटातमध्ये रोहित सराफ, योगिता बिहानी, शारीब हाश्मी आणि सत्यदीप मिश्रा यांच्याही महत्वाच्या भूमिका असणार आहेत.

‘विक्रम वेधा’ चित्रपट या देशांवर वर्चस्व गाजवेल :
‘विक्रम वेध’ जगभरातील 100 हून अधिक देशांमध्ये रिलीज होणार आहे तर असं करणारा हा बॉलिवूडमधील चित्रपटासाठी सर्वात मोठा ओपनिंग ठरणार आहे. उत्तर अमेरिका, यूके, मध्य पूर्व, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या प्रमुख बाजारपेठांव्यतिरिक्त, हा चित्रपट युरोपमधील 22 देशांमध्ये, आफ्रिकेतील 27 देश आणि जपान, रशिया, इस्रायल यांसारख्या अपारंपरिक देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे तसेच आणि पनामा पेरू सारखे लॅटिन अमेरिकन देश चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी तयार आहेत. दरम्यान, अशा परिस्थितीत चित्रपटाच्या सुरक्षेसाठी बरीच विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

‘विक्रम वेधा’ चित्रपटामध्ये दिसणार अॅक्शन-थ्रिलर :
‘विक्रम वेधा’ एक अॅक्शन-थ्रिलर चित्रपट असणार आहे. या चित्रपटाची कथा ट्विस्ट आणि टर्नने भरलेली असणार आहे. या चित्रपटामध्ये ऋतिक रोशन आणि सैफ अली खान यांची उंदीर मांजर सारखी पळापळी आणि लढाई होताना दिसूण येणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Vikram Vedha movie will release on September 30 Checks details 16 september 2022

हॅशटॅग्स

Vikram Vedha(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x