23 November 2024 5:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Stock Investment | या शेअरमध्ये 1 दिवसात 20 टक्के वाढ, 3 महिन्यांत 60 टक्के परतावा दिला, तेजीमुळे शेअर खरेदी करावा का?

Stock Investment

Stock Investment | भारतीय शेअर बाजारात टायर कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना भरघोस परतावा देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. भारतीय शेअर बाजारातील सर्वात महाग शेअर ही एका टायर कमोनीचाच आहे. आश्याच एका टायर कंपनीच्या स्टॉक बद्दल आपण माहिती घेणार आहोत. आपण ज्या स्टॉक बद्दल माहिती घेणार आहोत तो आहे सिएट कंपनीचा स्टॉक. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये ह्या शेअरमध्ये 20 टक्क्यांची वाढ झाली आणि शेअरची किंमत 1661 रुपये पर्यंत जाऊन पोहोचली. बाजारातील तेजीमुळे या टायर कंपनीच्या स्टॉकमध्येही कमालीची तेजी आली आहे. मागील तीन महिन्यांत सिएट कंपनीच्या स्टॉक मध्ये जवळपास 60 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. या शेअर्सनी जानेवारी 2018 मध्ये 2030 रुपयेची उच्चांक पातळी किंमत गाठली होती.

सिएट स्टॉक :
प्रसिद्ध टायर कंपनी सिएटच्या स्टॉकने मागील तीन महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा मिळवून दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशन मध्ये बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर या स्टॉकमध्ये तब्बल 20 टक्क्यांची वाढ होऊन शेअर ची किंमत 1661 रुपयांवर पोहोचली होती. भारतीय शेअर बाजारातील तेजीमुळे आणि परकीय गुंतवणूकीच्या आगमनामुळे सर्व टायरच्या स्टॉकमध्येही तेजी आल्याचे समजते.

3 महिन्यांत 60 टक्क्यांची वाढ :
सिएट कंपनीच्या स्टॉकमध्ये मागील तीन महिन्यांत 60 टक्क्यांची वाढ झाली आहे. CEAT कंपनी भारतातील टायर उत्पादन करणारी लोकप्रिय कंपनी आहे. CEAT कंपनीचे टायर ब्रँड म्हणूनही बाजारात लोकप्रिय आहेत. या कंपनीचा स्टॉक मार्च 2018 नंतर नवनवीन विक्रम प्रस्थापित करताना दिसत आहे. जानेवारी 2018 मध्ये शेअरच्या किमतीत विक्रमी वाढ झाली होती, आणि शेअरची किमती 2030 रुपये या आपल्या उच्चांक पातळी पर्यंत गेली होती.

ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल उत्साही :
भारतातील प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल देखील या स्टॉक च्या बाबतीत खूप उत्साही आहेत. आणि त्यांनी या स्टॉकची पुढील लक्ष किंमत 1630 रुपये असेल असा अंदाज वर्तवला आहे. ब्रोकरेज फर्म ने CEAT चे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मागील ट्रेडिंग सेशनमध्ये सीएट टायरच्या शेअरमध्ये एका दिवसात 276 रुपयांची वाढ झाली होती. एका दिवसात 20 टक्क्यांच्या वाढीसह शेअर 1661 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील तीन महिन्यांत सिएट कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 60 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी, सेन्सेक्समध्ये या कालावधीत फक्त 14 टक्केची वाढ नोंदविण्यात आली आहे. या टायर कंपनीने आर्थिक वर्ष 2022 च्या वार्षिक अहवालात म्हंटले आहे की आगामी काळात टायर उद्योग क्षेत्रात खूप मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण कोरोना महामारीचे निर्बंध संपल्यानंतर टायर आणि वाहनांची मागणी वाढेल. त्याचप्रमाणे येणाऱ्या सणासुदीच्या काळातही ऑटो सेक्टरमध्ये तेजी येईल.

भारतातील टायर उद्योगांच्या निर्यातीत आणखी सुधारणा होण्याची आशा कंपनीने वर्तवली आहे. कंपनीने आपल्या वार्षिक अहवालात म्हटले आहे की, अमेरिका आणि युरोपीय देशानी चीनमधून येणाऱ्या टायरवर आयात कर वाढवला आहे, त्याचा फायदा भारतीय कंपन्यांना पुढील होताना दिसेल. भारतीय शेअर बाजाराच्या तेजीत हा टायर स्टॉकही तेजीत राहिल आणि पुढेही तो आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा मिळवून देईल अशी अपेक्षा बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार हा स्टॉक सध्याच्या बाजारभावापेक्षा अजून वरील किमतीवर जाण्याची शक्यता आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Stock Investment tips of CEAT company share price return on 16 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x