22 November 2024 7:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Whatsapp Message Edit | प्रतीक्षा संपली, व्हॉट्सॲपमध्ये अफलातून फिचर, मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला एडिट करता येणार

Whatsapp Message Edit

Whatsapp Message Edit | व्हॉट्सॲप या लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्ममध्ये सतत नवनवीन फिचर्सचा समावेश केला जातो, याच्या मदतीने युजर्सचा चॅटिंगचा अनुभव सुधारता येऊ शकतो. आता हे ॲप अशा एका फीचरवर काम करत आहे, ज्याद्वारे आधी पाठवलेला मेसेज एडिट करता येईल. म्हणजेच मेसेज पाठवल्यानंतर युजर्सना त्यात बदल करता येणार आहेत. ‘एडिट सेंड मेसेजेस’ नावाचे हे फिचर पुढील अपडेट्समध्ये मिळू शकेल.

व्हॉट्सॲप अपडेट्स आणि फिचर्सची माहिती देणाऱ्या वाबेटाइन्फो या प्लॅटफॉर्मने म्हटलं आहे की, नव्या एडिट मेसेज फीचरमुळे युजर्सला बदल करण्याचा आणि मेसेज पाठवल्यानंतर अपडेट करण्याचा पर्याय मिळेल. हे नुकतेच गुगल प्ले बीटा प्रोग्रामसह वर्जन 2.22.20.12 चा भाग बनविण्यात आले आहे. वेबसाइटने या फीचरचा स्क्रीनशॉटही शेअर केला असून सध्या तो विकासाच्या टप्प्यात आहे.

बीटा युझर्ससह टेस्टिंग :
व्हॉट्सॲप नवीन एडिट मेसेज फीचरवर काम करत असून चूक असल्यास आधी पाठवलेला मेसेज डिलीट करण्याऐवजी युजर्सना फक्त एडिट करण्याची संधी मिळेल, असे अहवालात म्हटले आहे. नवीन फीचरची रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही, मात्र मेटाच्या मालकीचं हे ॲप आधी बीटा युजर्ससोबत याची टेस्टिंग घेणार आहे. फीडबॅकच्या आधारे, ते सर्वांसाठी लाँच केले जाईल.

एडिट मेसेज कसे कार्य करेल :
व्हॉट्सॲपवर एडिट मेसेज फीचर कसं काम करेल हे स्पष्ट नाही. एखादा जुना मेसेज एडिट करताना चॅटचा अर्थ पूर्णपणे बदलता येतो, त्यामुळे एडिटेड मेसेजसोबत ‘एडिटेड’ लेबल दाखवलं असण्याची शक्यता आहे. तसेच युजर्सला एडिट हिस्ट्री पाहण्याचा पर्याय मिळू शकतो. हे शक्य आहे की संदेश पाठवल्यानंतर केवळ मर्यादित काळासाठीच एडिट मेसेज फीचर दिले जाईल.

हे नवे फिचर्सही लवकरच ॲपमध्ये उपलब्ध होणार आहेत :
बीटा टेस्टर्ससोबतच व्हॉट्सॲप इतर फिचर्सचीही चाचणी घेत आहे. यासह, वापरकर्त्यांना त्यांचे ऑनलाइन स्टेटस लपवणे आणि गटांना मतदान पाठविणे यासारखे पर्याय मिळतील. तसेच, मेसेजिंग ॲप लवकरच नव्या फिचर्सवर फिडबॅक मिळवण्यासाठी इन ॲप सर्व्हेचा पर्याय घेऊन येऊ शकतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Whatsapp Message Edit will be available soon check details 18 September 2022.

हॅशटॅग्स

#Whatsapp Message Edit(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x