3 December 2024 10:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड-न्यूज, 53% डीएसह 2 भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली
x

Multibagger Stocks | या शेअरचे गुंतवणूकदार भरमसाठ नफा कमावत आहेत,1 लाखाच्या गुंतवणुकीवर 1 कोटीचा परतावा दिला, स्टॉक कोणता?

Multibagger Stocks

Multibagger Stocks | दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास शेअर बाजारातून चांगला परतावा कमावता येतो. शेअर बाजारातील सर्व यशस्वी गुंतवणूकदार आणि तज्ञ नेहमी शक्य तितक्या काळासाठी स्टॉक होल्ड करून ठेवण्याचा सल्ला देतात. स्टॉक जास्तीत जास्त कालावधीसाठी होल्ड केले, तर जोखीम कमी होण्यास मदत होते, आणि जास्तीत जास्त परतावा कमावता येतो. यासह गुंतवणूकदारांनी इतर उत्पन्नाचे स्रोत देखील तयार केले पाहिजे, ज्यातून ते दीर्घकालीन गुंतवणूक करून इक्विटी मार्केटसारखे रिटर्न्स कमवू शकतात. दीर्घकालीन गुंतवणुकीच्या अनेक योजना बाजारात उपलब्ध आहेत.

आयटीसी लिमिटेड स्टॉक :
आज आपण ज्या स्टॉक बद्दल माहिती घेणार आहोत, त्याचे नाव आहे “आयटीसी “. ITC या प्रसिद्ध कंपनीच्या शेअर्सनी आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना करोडोचा परतावा कमावून दिला आहे. काही वर्षांपूर्वी ITC कंपनीचा शेअर 14.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, तो आता 331.50 रुपये पर्यंत जाऊन पोहोचला आहे. म्हणजेच या काळात ह्या स्टॉक मध्ये जवळपास 23 पट अधिक वाढ झाली आहे. ITC च्या स्‍टॉकमधे वाढ होण्‍यासोबतच कंपनीने अनेकदा शेअर बायबॅक, बोनस शेअर्स, डिव्हिडंड इत्‍यादी सर्व पद्धतीने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना फायदा मिळवून दिला आहे.

दोन दशकांत दिले तीन वेळा बोनस शेअर्स :
आयटीसी ने आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना तीन वेळा बोनस शेअर्स वितरीत केले आहेत. मागील दोन दशकांमध्ये ITC कंपनीच्या शेअरची किंमत 14.50 रुपये वरून 331.50 रुपये प्रति शेअर या किमती पर्यंत वाढली आहे. मागील दोन दशकात आयटीसी च्या स्टॉक मध्ये तब्बल 23 पट वाढ झाली आहे. मागील 20 वर्षांत आयटीसी कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना तीन वेळा बोनस शेअर्स वितरीत केले होते, त्यामुळे शेअर्सची किंमत जवळपास 102 पटीने वाढली आहे. FMCG क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या या कंपनीने दीर्घकालीन गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स वितरीत केले होते, परिणाम स्वरूप गुंतवणूकदारांनी ही त्यातून गुंतवणुकीच्या 4 पट अधिक परतावा कमावला आहे.

आयटीसी बोनस शेअर वितरण प्रमाण :
BSE च्या वेबसाइटवरील उपलब्ध माहितीनुसार, आयटीसी ने मागील 20 वर्षांत तीन वेळा बोनस शेअर्स वितरीत केले आहेत. सप्टेंबर 2005 मध्ये कंपनीने 1:2 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत केले होते. म्हणजेच त्यावेळी एका गुंतवणूकदाराला कंपनीच्या दोन शेअर्सवर एक बोनस शेअर मोफत देण्यात आला होता. ऑगस्ट 2010 मध्ये सुद्धा, आयटीसीने 1:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत केले. म्हणजेच एका शेअरवर एक बोनस मोफत देण्यात आला होता. नंतर जुलै 2016 मध्ये आयटीसी ने 1:2 या प्रमाणात बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली होती. त्यावेळी कंपनीने दोन शेअर्सवर एक बोनस शेअर मोफत दिला होता.

भागधारकांवर बोनस शेअर्सचा प्रभाव :
जर तुम्ही 20 वर्षांपूर्वी ITC शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवणूक केले असते, तर तुम्हाला 14.50 रुपये प्रति शेअर या किमतीत आयटीसीचा एक शेअर मिळाला असता. जून 2002 मध्ये ITC शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवलेल्या व्यक्तीला 6,896 आयटीसीचे शेअर्स मिळाले. सप्टेंबर 2005 मध्ये कंपनीने 1:2 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत केल्यानंतर, भागधारकाच्या शेअरची संख्या 10,344 झाली. त्याचप्रमाणे, ऑगस्ट 2010 मध्ये 1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स जारी केल्यानंतर गुंतवणूकदारांचे 10,344 शेअर्स दुप्पट झाले, आणि त्यांची संख्या 20,688 झाली होती. जेव्हा या FMCG कंपनीने जुलै 2016 मध्ये 1:2 बोनस शेअर्सची घोषणा केली तेव्हा गुंतवणूकदाराला 20,688 शेअर्सवर 1:2 प्रमाणत शेअर्स वितरीत केले, आणि त्याची संख्या 31,032 झाली. त्यामुळे, ITC मधील गुंतवणूकदाराची गुंतवणूक 6,896 शेअर्स वरून 31,032 पर्यंत वाढली.

गुंतवणुकीवर परतावा : NSE निर्देशांकावर आयटीसी कंपनीचा शेअर 331.50 रुपयेवर ट्रेड करत आहे. जून 2022 मध्ये तुम्ही आयटीसी कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 1.03 कोटी रुपये झाले असते. जर समजा कंपनीने संपूर्ण काळात कोणतेही बोनस शेअर्स वितरीत केले नसते, तर गुंतवणूकदाराला 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 23 लाखाचा परतावा मिळाला असता. कारण मागील वीस वर्षांत शेअर्स मध्ये 23 पट अधिक वाढ झाली आहे. भरमसाठ बोनस शेअर्स ऑफर करणार्‍या आयटीसीच्या स्टॉकमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास लाखाचे करोड बनवण्याची क्षमता आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks of ITC Share Price return on 19 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x