22 November 2024 5:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

Investment Tips | या योजनेत फक्त 1 हजार रुपये मासिक गुंतवणूक करून 20 हजार रुपयांची पेन्शन मिळवा, योजनेबद्दल जाणून घ्या

Investment tips

Investment Tips| जर तुम्ही निवृत्तीसाठी आर्थिक नियोजन करण्याचा विचार करत असाल, आणि अद्याप तुमच्या निवृत्तीचे नियोजन केले नसेल, तर आम्ही तुमच्या साठी एक जबरदस्त योजनेची माहिती घेऊन आलो आहोत. आज या लेखात आम्ही तुम्हाला नॅशनल पेन्शन स्कीमबद्दल माहिती देणार आहोत. या पेन्शन योजनेत कोणत्याही प्रकारची जोखीम किंवा धोका नाही, कारण ही योजना भारत सरकार द्वारे संचालित योजना आहे. ह्या योजनेतील गुंतवणुकीवर भारत सरकार द्वारे सुरक्षित परतावा दिला जातो. त्यामुळे या पेन्शन योजनेत गुंतवणूक करणे सुरक्षित मानले जाते. या पेन्शन योजनेत तुम्ही तुमच्या निवृत्तीपर्यंत मासिक ठराविक रक्कम गुंतवणूक करू शकता. तुमचा सेवानिवृत्ती वयापर्यंत तुमच्याकडे एक चांगला फंड तयार झाला असेल. जर या योजनेत तुम्ही लवकर गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुमच्यावर जास्त बोझा पडणार नाही.

राष्ट्रीय पेन्शन योजना सविस्तर :
जानेवारी 2004 रोजी भारत सरकारने ही राष्ट्रीय पेन्शन योजना सुरू केली होती. सुरुवातीला ही पेन्शन योजना फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली होती, मात्र 2009 मध्ये सरकारने ही योजना सर्वांसाठी खुली केली. या योजनेला एनपीएस योजना या नावानेही ओळखले जाते.राष्ट्रीय पेन्शन योजनेची अधिकृत वेबसाईट सरकारद्वारे चालवली जाते, तुम्ही या वेबसाईट ला भेट देऊन सविस्तर अटी व शर्ती जाणून घेऊ शकता.या योजनेत दर मासिक 1 हजार रुपये जमा करून तुम्ही, मुदतपूर्ती नंतर दरमहा 20 हजार रुपये मासिक पेन्शन मिळवू शकता.चला तर मग एका उदाहरणाच्या मदतीने ही योजना समजून घेऊ.

योजनेतील गुंतवणुकीवर परतावा :
समजा तुमचे सध्याचे वय 20 वर्ष आहे. नोकरी मिळाल्यानंतर तुम्ही एनपीएस योजनेमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. तुम्ही सध्या या योजनेत दर महिन्याला 1 हजार रुपये जमा करत आहात, आणि निवृत्तीनंतर म्हणजेच अंदाजे वय वर्ष 60 पर्यंत तुमची एकूण गुंतवणूक 5.4 लाख रुपये होईल. जर तुम्हाला या योजनेत वार्षिक 10 टक्के इतका परतावा चक्रवाढ व्याज पद्धतीने मिळाला तर,तुमच्या गुंतवणूकीचे एकूण मूल्य 1.05 कोटी रुपये होईल. तसेच एक महत्वाची गोष्ट जाणून घेणे गरजेचे आहे की, एनपीएसचा 40 टक्के हिस्सा अॅन्युइटी खरेदी करण्यासाठी वापरला जातो. त्यानुसार, दर वर्षी अॅन्युइटी खरेदी करण्यासाठी 42.28 कोटी रुपये वापरले जातात. जर या योजनेवर तुम्हाला चक्रवाढ व्याज पद्धतीने 10 टक्के वार्षिक परतावा मिळाला, तर निवृत्तीनंतर तुम्हाला दर महिन्याला 21,140 रुपये मिळू शकेल. यासोबतच जर तुम्ही एकरकमी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर, तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर 63.41 लाख रुपये एकरकमी परतावा मिळेल. योजनेत गुंतवणूक करण्यासाठी योजनाधरकाचे वय 18 वर्षांपेक्षा अधिक असावे, अशी अट आहे. अठरा वर्ष वयापेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती NPS योजनेअंतर्गत खाते उघडू शकते.

समजा तुमच्या पगारात दर वर्षी ठराविक वाढ होत असेल, त्या दराने तुम्ही योजनेतील गुंतवणूक देखील वाढवली, तर योजनेची मुदत पूर्ण झाल्यावर तुम्हाला मिळणाऱ्या पेन्शनमध्येही वाढ होईल. या योजनेत तुम्हाला निवृत्तीनंतर एकरकमी रक्कम देखील दिली जाते, आणि सोबत पेन्शन लाभ देखील मिळतो. तुम्ही तुमच्या वृध्द काळाचे आर्थिक नियाजन आतापासून करायला हवे. भविष्यात महागाई दर, आणि पैशाचे अवमूल्यन अधिक प्रमाणात होईल, त्यासाठी तुम्ही तुमच्या भविष्यातील पेन्शन चे नियोजन आतापासूनच केले पाहिजे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Investment tips on National pension scheme for long term investment benefits on 20 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x