मोदींच्या राफेल खरेदी घोषणेच्या १५ दिवस आधीच अनिल अंबानींचा फ्रान्स दौरा

नवी दिल्ली : फ्रान्सकडून राफेल लढाऊ विमानं खरेदी करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेच्या पंधरा दिवस आधीच उद्योगपती अनिल अंबानी यांनी फ्रान्सच्या तत्कालीन संरक्षण अधिकाऱ्यांची खासगी भेट घेतल्याचे खात्रीलायक वृत्त इंडियन एक्स्प्रेसच्या हाती आले आहे.
फ्रान्सकडून एकूण ३६ राफेल लढाऊ विमानं खरेदी करण्याच्या अधिकृत घोषणेच्या पंधरा दिवस आधी, म्हणजे मार्च २०१५च्या चौथ्या आठवडय़ात उद्योगपती अनिल अंबानी यांनी फ्रान्सचे तत्कालीन संरक्षणमंत्री जाँ-येवेस ली ड्रायन यांच्या पॅरिसमधील कार्यालयात जाऊन तेथील उच्चपदस्थ सल्लागारांशी सविस्तर बैठक घेतली. संबंधित बैठकीला ली ड्रायन यांचे विशेष सल्लागार जाँ-क्लॉद मॅलेट, त्यांचे उद्योग सल्लागार ख्रिस्तोफ सालोमन आणि औद्योगिक व्यवहारांचे तांत्रिक सल्लागार जॉफ्री बुकॉट देखील उपस्थित होते. संबंधित बैठक अत्यंत गोपनीय आणि तातडीची सूचना देऊन बोलावण्यात आली होती, असे सालोमन यांनी एका युरोपीय संरक्षण कंपनीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला सांगितले होते.
संबंधित बैठकीबाबत महत्वपूर्ण माहिती दिलेल्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, अनिल अंबानी यांनी व्यावसायिक तसेच संरक्षण अशा दोन्ही प्रकारच्या हेलिकॉप्टर्सच्या संबंधात ‘एअरबस हेलिकॉप्टर्स’सोबत काम करण्याची इच्छा त्यावेळी दर्शवली होती. या संदर्भात एक सामंजस्य करार म्हणजे ‘मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग’ तयार होत असून, भारताच्या पंतप्रधानांच्या फ्रान्स भेटीत त्यावर स्वाक्षरी केली जाण्याची शक्यता देखील त्यांनी त्या बैठकीत व्यक्त केली होती, असे कळते.
अनिल अंबानी यांनी फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांच्या कार्यालयाला खासगी भेट दिली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ ते ११ एप्रिल २०१५ या कालावधीत फ्रान्सचा अधिकृत दौरा करतील, हे जवळपास स्पष्ट झाले होते. धक्कादायक म्हणजे नंतर या दौऱ्यात पंतप्रधानांच्या प्रतिनिधीमंडळात अनिल अंबानींचा देखील समावेश होता. दरम्यान, याच भेटीत नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात ३६ राफेल विमानांच्या खरेदीव्यवहाराची अधिकृत घोषणा केली होती. अजून एक योगायोग म्हणजे ही बैठक झाली त्याच आठवडय़ात, म्हणजे २८ मार्च २०१५ रोजी ‘रिलायन्स डिफेन्स’चा समावेश संबंधित व्यवहारात करण्यात आला. या संदर्भात ली ड्रायन यांच्या अधिकृत प्रवक्त्याला मागील आठवडय़ात पाठवलेल्या ई-मेलला त्यांनी कोणताही प्रतिसाद अद्याप दिलेला नाही. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाला पाठवलेल्या ई-मेलनाही त्यांनी कोणताही उत्तर दिलेले नाही.
दरम्यान,पंतप्रधान मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यापूर्वी म्हणजे ८ एप्रिल २०१५ रोजी भारताचे संरक्षण सचिव एस. जयशंकर यांनी देखील पत्रकारांना म्हणजे प्रसार माध्यमांना माहिती देताना संभाव्य राफेल लढाऊ खरेदी व्यवहाराबाबत कोणतीही सविस्तर माहिती दिली नव्हती.
एचएएल ही भारत सरकारची अनुभवी कंपनी १०८ राफेल विमान निर्मिती कंत्राटातील अधिकृत कंपनी होती, मात्र नंतर पार पडलेल्या व्यवहारात या कंपनीचा सहभागच नव्हता. राफेल लढाऊ विमानांची निर्मिती करणाऱ्या फ्रान्सस्थित दसाँ एव्हिएशनसाठी अनिल अंबानींचा रिलायन्स समूह हा या व्यवहारातील महत्वाचा भागीदार होता. फ्रान्स आणि भारत यांच्या झालेल्या या तब्बल ५८,००० कोटींच्या या खरेदी व्यवहारात अंबांनींच्या कंपनीला तब्बल ३०,००० हजार कोटींची दलाली मिळाल्याचा आरोप आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE