13 December 2024 2:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO Horoscope Today | काही वेळातच 'या' राशींना मिळणार आनंदाची बातमी; जीवनात नवीन संधी प्राप्त होतील तर, काहींना पैसा HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, फायदा घ्या - NSE: RELIANCE
x

Post Office Scheme | या पोस्ट ऑफिस योजनेत 10 वर्षांवरील मुलांच्या नावाने खाते उघडा, मिळवा दरमहा 2500 रुपये व्याज, अधिक जाणून घ्या

Post office scheme, Monthly income saving scheme, Investment for kids, Short term investment,

Post Office Scheme | सर्व पालक आपल्या मुलांच्या सुरक्षित आर्थिक भविष्याचा विचार करत असतात. आणि मुलांच्या चांगल्या आयुष्यासाठी गुंतवणूक करत असतात. गुंतवणूक बाजारात अश्या बऱ्याच योजना आहेत, ज्यात तुम्ही गुंतवणूक करून आपल्या मुलांचे आर्थिक जीवन सुरक्षित करू शकता. जर तुमच्या मुलांचे वय 10 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असेल आणि तुम्हाला त्याच्या सुरक्षित आर्थिक जीवनासाठी गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही आजच त्यांच्या नावावर पोस्ट ऑफिसचे “एमआयएस खाते” उघडून गुंतवणूक करू शकता. MIS खात्यात गुंतवणूक केल्यास तुम्हाला प्रचंड फायदे मिळतील. चला तर मग जाणून घेऊया, पोस्ट ऑफीस च्या MIS योजनेबद्दल

पोस्ट ऑफिस एमआयएस योजना :
आपण सर्वजण गुंतवणूक करताना नेहमी, सुरक्षित आणि जोखीम नसलेली गुंतवणूक योजना शोधत असतो ज्यातून आपल्याला चांगला परतावाही कमावता येईल.तुम्हीही जेर अशीच एखादी सुरक्षित आणि हमखास परतावा देणारी गुंतवणूक योजना शोधत असाल तर, पोस्ट ऑफिसची MIS योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. पोस्ट ऑफिस एमआयएस ही अशी एक अल्प बचत योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही एकरकमी गुंतवणूक करून दर महिन्याला व्याजाच्या स्वरूपात लाभ मिळवू शकता. या पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीमचे अनेक फायदे देखील आहेत. या योजनेत 10 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मुलांच्या नावाने देखील खाते उघडता येते. जर तुम्ही तुमच्या मुलांच्या नावाने पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना खाते उघडले तर तुम्हाला मुलांच्या भविष्यातील शिक्षण खर्च करण्याची चिंता राहणार नाही. तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करून मुलांच्या शिक्षणासाठी चांगले पैसे बचत करू शकता.

गुंतवणूक खाते उघडण्याची प्रक्रिया :
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेचे खाते कोणत्याही पोस्ट ऑफिसच्या जवळच्या शाखेमध्ये उघडता येतात. या अंतर्गत योजनेअंतर्गत किमान गुंतवणूक मर्यादा 1000 रुपये आणि कमाल गुंतवणूक मर्यादा 4.5 लाख रुपये ठरवण्यात आली आहे. सध्या पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेअंतर्गत व्याज दर 6.6 टक्के निश्चित करण्यात आला आहे. जर तुमच्या मुलांचे वय 10 वर्षांपेक्षा अधिक असेल, तर तुम्ही MIS योजना खाते उघडून त्यांच्या नावावर गुंतवणूक सुरू करू शकता. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षे असून, मुदतपूर्तीनंतर गुंतवणूक हवी तेव्हा बंद करता येते.

योजनेतून मिळणारा परतावा :
जर तुमचे मूल 10 वर्षांचे असेल आणि तुम्ही त्याच्या नावावर 2 लाख रुपये एकरकमी गुंतवणूक केले, तर दर महिन्याला मिळणारा व्याज परतावा 6.6 टक्के दराने 1200 रुपये असेल. पुढील पाच वर्षांत, तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर एकूण 77 हजार रुपये व्याज परतावा मिळेल. आणि मुदत पूर्ण झाली की तुम्हाला दोन लाख परत मिळतील. या योजनेत फक्त दोन लाख गुंतवणूक केल्यास तुम्हाला दर महिन्याला 1200 रुपये व्याज रुपात मिळतील, जे तुम्ही मुलाच्या शिक्षणासाठी वापरू शकता. ही रक्कम जास्त नसली तरी पालकांना त्यातून थोडीफार आर्थिक मदत होऊ शकते. त्याचप्रमाणे तुम्ही 4.5 लाख रुपये एकरकमी गुंतवणूक केल्यास तुम्हाला दरमहा 2900 रुपये व्याज परतावा मिळेल. या योजनेची एक खास गोष्ट अशी आहे की, जेवढी जास्त रक्कम गुंतवणूक कराल, तेवढा जात व्याज परतावा मिळेल.

2250 रुपये दरमहा व्याज परतावा :
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे ते एका व्यक्तीला एक खाते उघडण्याची परवानगी तर देतेच. सोबतच, तीन किंवा अधिक व्यक्तींनाही संयुक्त खाते उघडण्याची मुभा देते. जर तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन मासिक उत्पन्न योजना खाते उघडले आणि त्यात एकरकमी 3.50 लाख रुपये गुंतवणूक केले, तर तुम्हाला सध्याच्या व्याज दरानुसार दरमहा 2250 रुपये व्याज परतावा मिळेल. म्हणजेच याद्वारे तुम्ही तुमच्या मुलाच्या शिक्षणावर हे पैसे खर्च करू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Post office MIS scheme investment for good return check details 15 June 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x