22 November 2024 2:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

Hair Growth Tips At Home | तुमचे केस केवळ लांबच नाही तर काळे, दाट आणि चमकदारही होतील, फॉलो करा या टिप्स

Hair Growth Tips At Home

Hair Growth Tips At Home | महिलांना लांब केस खूप आवडातात मात्र त्यांची निगा राखणे कठीन होऊन जाते आणि लांब केसांची काळजी घेण्यासाठी महिला वेगवेगळे प्रयोग आपल्या केसांवर करत असतात. विशेषत: प्रत्येक स्त्रीला हे जाणून घ्यायचे आहे की नैसर्गिक पद्धतींनी केस कसे लांब करायचे. बाजारामध्ये आपल्याला लांब केसांसाठी अनेक उत्पादने मिळून जातात मात्र ते केसांना जास्त प्रभावी ठरत नाहीत. तुम्हाला लांब केसांची इच्छा आहे मात्र तुमची ही इच्छा पुर्ण होऊ शकतं नाही असे तुम्हाला वाटते पण आज आम्ही तुमच्यासाठी काही खास घेऊन आलो आहोत. जेणे करून तुमचे केस लांबलचक होऊ शकतात.

आज आम्‍ही तुम्‍हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे केस केवळ लांबच नाही तर काळे, दाट आणि चमकदारही करू शकतात. हा उपाय आम्हाला सौंदर्य तज्ञ भारती तनेजा यांनी सांगितला आहे तर भारतीजी म्हणतात की, ‘दूध प्रत्येकाच्या घरी असते आणि हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. तुम्ही केसांमध्ये याचा वापर करू शकता कारण केस देखील प्रोटीनने बनलेले असतात आणि प्रोटीनच्या कमतरतेमुळे केसांमध्ये सर्व समस्या सुरू होतात.

दुधासह केसांना प्रोटीन ट्रीटमेंट द्या
साहित्य

* 1 अंडे
* 1 कप कच्चे दूध
* 1 टीस्पून नारळ तेल
* 1/2 कप गाजर रस
* 1 चमचे मध

एका वाटीमध्ये अंडी फोडा आणि त्याचा पिवळा भाग वेगळा करा. ‘अंड्याच्या पांढऱ्या भागात सर्वाधिक प्रोटीन असते आणि ते केसांसाठीही खूप फायदेशीर असते.
आता एका भांड्यात खोबरेल तेल, गाजराचा रस, दूध आणि मध एकत्र करून मिश्रण करा मिश्रणात एकही गुठळी नसावी, अन्यथा ते केसांमध्ये अडकू शकते आणि केस धुताना कठीण होऊ शकते. अशा परिस्थितीत तुमच्या केसांना फायदा कमी आणि नुकसान जास्त होऊ शकते याची काळजी घ्या. आता हे मिश्रण केसांना ब्रश आणि कंगव्याच्या मदतीने लावून घ्या. तसेच तुम्ही ते टाळूवर आणि केसांची लांबी दोन्हीवर लावू शकता. हे मिश्रण केसांमध्ये 30 मिनिटे ते 1 तास ठेवा यानंतर तुमचे केस साधारण पाण्याने किमान 3 ते 4 वेळा धुवा. जर अंड्यांचा वास जास्त येत असेल तर तुम्ही शॅम्पूचा देखील वापरू शकता. हा घरगुती हेअर पॅक महिन्यातून फक्त 2 वेळा फॉलो करा, तुम्हाला लवकरच खूप चांगले परिणाम दिसून येईल.

काय फायदे होतील :
या हेअर केअर होम ट्रीटमेंटमुळे तुमच्या केसांना योग्य प्रमाणात प्रोटीन मिळेल, ज्यामुळे केसांची लवकर वाढ होईल. तुमच्या केसांची शाईन वाढण्यास मदत होईल इतकंच नाही तर केस खूप पातळ असतील तर ते दाटही होतील. केसांना मुलायम बनवण्यासाठीही हा हेअर पॅक फायदेशीर आहे आणि केस गळण्याची समस्या देखील या घरगुती उपायाने कमी करता येते. शिवाय, जर तुमचे केसांना फाटे फुटत असतील, तर त्याचे कारण केसांमध्ये प्रोटीनची कमतरता देखील असू शकते आणि या घरगुती उपायाने तुम्हाला फायदा होईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Hair Growth Tips for fashionable look checks details 20 September 2022.

हॅशटॅग्स

Hair Growth Tips At Home(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x