22 November 2024 6:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

Investment Scheme | वायफळ खर्च टाळून तुम्ही रोज फक्त 45 रुपयांची बचत करा, मुदतपूर्तीवर मिळेल 7 लाखाचा परतावा

Investment Scheme, Sukanya samruddhi yojna, Investment benifit, Income tax benifits, investment for girl child,

Investment Scheme | भारतात कन्येला लक्ष्मीचे रूप मानले जाते, पण घरात जेव्हा मुलीचा जन्म होतो तेव्हा आई-वडिलांची जबाबदारीही वाढते. अनेकदा असे दिसून आले आहे की पालक आपल्या मुलींच्या लग्नाविषयी खूप चिंतित असतात. आणि त्यांच्या भविष्यासाठी आर्थिक सुरक्षितता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्या देशात पालकांना मुलींच्या शिक्षणापेक्षा त्यांच्या लग्नाची जास्त काळजी असते. मग ते मुलीच्या लग्नासाठी सर्व प्रकारची आर्थिक तडजोड करतात. मुलीच्या लग्नासाठी पैसा कुठून येणार? किंवा उच्च शिक्षणाचा खर्च कसा भागवणार? या चिंतेत पालक असतात.

पालकांनी आपल्या मुलीच्या लहान वयापासूनच तिच्यासाठी गुंतवणूक केली तर त्यांना मुलीच्या लग्नासाठी किंवा शिक्षणासाठी कोणतीही पैशांची अडचण येणार नाही. त्यासाठी तुम्हाला बचत करण्याची सवय लावावी लागेल. आज या लेखात आम्ही तुम्हाला अश्या एका जबरदस्त योजनेबद्दल माहिती देणार आहोत,ज्यात तुम्ही दररोज फक्त 45 रुपयांची बचत करू शकता, आणि दीर्घकाळात 7 लाख रुपयांपर्यंतचा निधी उभारू शकता.

गुंतवणूक कशी करावी? :
जर तुम्हाला आपल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवायचा असेल, तर तुम्ही केंद्र सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करू शकता. भारत सरकारने 2015 साली मुलींचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही योजना सुरू केली होती. या योजनेत गुंतवणूक सुरू करण्यासाठी तुम्ही 250 रुपयांच्या नाममात्र रकमेसह कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडू शकता, आणि पैसे जमा करू शकता. या योजनेत गुंतवणूक केल्यावर मुदत पूर्ती झाली की,सरकारद्वारे तुमच्या ठेवीवर 7.60 टक्के व्याज दराने परतावा दिला जाईल.

परतावा आणि कालावधी :
सुकन्या समृध्दी योजनेत आपण दररोज 45 रुपयांची गुंतवणूक करून दीर्घकाळात मोठा परतावा मिळवू शकतो. या योजनेत नियमित गुंतवणूक करून तुम्ही 7 लाख रुपयांपर्यंत परतावा मिळवू शकता. त्यासाठी या योजनेत तुम्हाला वार्षिक 16,500 रुपयांचे योगदान द्यावे लागेल. मासिक आधारावर हे योगदान 1375 रुपये असेल.त्याच वेळी दैनंदिन आधारावर फक्त 45 रुपये जमा करावे लागेल. या योजनेत वार्षिक 16,500 रुपये गुंतवले तर 21 वर्षांच्या मुदतीनंतर तुम्हाला 7 लाख रुपयांचा परतावा मिळू शकतो. यामध्ये 21 वर्षात तुमचे एकूण योगदान 2 लाख 48 हजार असेल, आणि त्यावर व्याज जोडून तुम्हाला एकूण 7 लाखाचा परतावा मिळेल.

कर सवलत लाभ :
सुकन्या समृध्दी योजनेअंतर्गत एका आर्थिक वर्षात कमाल 1.5 लाख रुपये जमा करत येतात. त्याच वेळी, आयकर कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत गुंतवणूकदाराला 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर कर सवलतीचा लाभ मिळतो. या योजनेचे खाते तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा बँकेच्या शाखेत उघडू शकता. पालक फक्त दोन मुलींसाठी या योजनेत खाते उघडू शकतात, त्यासाठी मुलीचे किमान 10 वर्ष असावे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Investment Scheme of Sukanya Samruddhi Yojana benefits 21 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x