19 April 2025 3:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | मालामाल करणार टाटा टेक शेअर्स, मिळेल 66 टक्के परतावा, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH ITI Share Price | आयटीआय शेअर फोकसमध्ये, यापूर्वी दिला 2309 टक्के परतावा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ITI Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL
x

Viral Video | कुत्र्याने अचानक केलेला हल्ला कॅमेऱ्यात कैद, काही सेकंदात अक्षरशः फाडून काढलं, व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल

Viral Video

Viral Video | रस्तावर भटकणाऱ्या कुत्र्यांचा काही नेम नसतो, चालता चालता ते कधी हमला करतील सांगताही येत नाही. दरम्यान, असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये रोडवरील भटकणाऱ्या कुत्र्याने सायकल स्वार असलेल्या एका मुलावर हमला केला. या कुत्र्याने जेव्हा त्या व्यक्तीवर हमला केला तेव्हा त्याने थांबण्याचे नावच घेतले नाही.

भटक्या कुत्र्याने लहान मुलाचा घेतला चावा
रोडवरील भटकणाऱ्या कुत्र्याने सायकल स्वार असलेल्या 11-12 वर्षांच्या मुलावर हमला केला आणि त्या कुत्र्याने असा चावा घेतला की तो थांबण्याचे नावच घेईना. ही घटना केरळमधील आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तो मुलगा सायकल वर उभा आहे आणि अचानक दुसऱ्या बाजूने कुत्रा येतो आणि अचानक त्या मुलावर हल्ला करतो. तो मुलगा खाली पडतो आणि कुत्र्यापासून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करतो मात्र तो कुत्रा मुलाला पायाला हाताला चावा घेतच राहतो. कस बसं तो मुलगा त्या कुत्र्याच्या तावडीतून स्वत:चा बचाव करतो आणि तिथून निघून जातो.

व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, ही घटना रविवारी घडली असून सायकलस्वार सातवीचा विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओनुसार, एका घराच्या गेटबाहेर काही मुलं उभा आहेत, त्यादरम्यान सायकल स्वार मुलावर एका कुत्र्याने अचानक हल्ला केला. घडणारा हा प्रकार पाहून मुलांनी तेथून पळ काढला पण तो मुलगा त्या कुत्र्यापासून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करत होता, मात्र त्या कुत्र्याने त्यामुलाचा हात जबड्यात घेतला, आणि जेव्हा तो मुलगा खाली पडला तेव्हा त्याच्या अंगावर पडून चावत राहिला.

काही वेळानंतर मुलाने कुत्र्यापासून वाचवले स्वत:ला
हा प्रकार जेव्हा घडत होता तेव्हा शेजारील घरामध्ये उपस्थित असलेले लोक त्या मुलाला वाचवण्यासाठी धावले, मात्र तो पोहोचेपर्यंत कुत्र्याने मुलाच्या शरिरावर बऱ्याच ठिकाणी चावा घेतला होता. शेवटी, मुलाने स्वतःला वाचवण्यासाठी घरात प्रवेश केला आणि कसा तरी स्वतःला वाचवण्यात यश मिळविले. याच दरम्यान कुत्रा तेथून निघून जातो आणि गेल्या काही दिवसांपासून कुत्र्यांच्या चाव्याच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे, काही वेळा कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर दुखापत होत असल्याचे दिसून आले आहे. गाझियाबादमध्ये एका पिटबुलने एका मुलाला अशा प्रकारे चावला की त्याच्या चेहऱ्यावर 150 हून अधिक टाके पडले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video of dog attack suddenly video trending on social media checks details 21 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Dog Attack(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या